Saturday, April 27, 2024
Homeनंदुरबाररांझणी-रोझवा शिवारात ऊस जळून खाक

रांझणी-रोझवा शिवारात ऊस जळून खाक

चिनोदा (Chinoda) ता.तळोदा । वार्ताहर

तळोदा तालुक्यातील रांझणी-रोझवा (Ranjhani-Rozwa) शिवारात विद्युत ट्रान्सफार्मरवर (power transformer) शार्ट सर्किट (Short circuit) झाल्याने तोडणीस आलेल्या बारा एकर क्षेत्रातील ऊस (sugarcane) जळून (Burn) खाक झाल्याची घटना घडली. या शेतकर्‍यांचे सुमारे दहा ते बारा लाखाचे नुकसान (Damage) झाले आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक वृत्त असे की, रांझणी-रोझवा शिवारात विद्युत ट्रान्सफार्मरवर शॉर्ट सर्किटमुळे चिनोदा येथील शेतकरी दिलीप लक्ष्मण मराठे यांचे रोझवा शिवारात गट नं. 46/1 हे ऊसाचे क्षेत्र आहे. या क्षेत्रात एकूण चार ऐकर ऊसाची लागवड केली होती. तर प्रदिप लक्ष्मण मराठे गट नं.46/2 या क्षेत्रात दोन ऐकर ऊसाची लागवड केली होती.

तसेच रांझणी येथील शेतकरी भूषण मल्हारी कापसे गट नं 44/1 या क्षेत्रात दोन ऐकर ऊसाची लागवड तर लताबाई मल्हारी मराठे गट नं.44/2 या क्षेत्रात चार ऐकर ऊसाची लागवड केली होती. दि.4 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास विद्युत ट्रान्सफार्मरवर शॉर्टसर्किट होऊन ऊसाने पेट घेतला.

क्षणार्धात आगीने रौद्ररुप धारण केले. यात चिनोदा येथील दोन शेतकर्‍यांचे सहा एकर तर रांझणी येथील दोन शेतकर्‍यांचे सहा असे एकूण 12 ऐकर क्षेत्रावरील ऊस शार्ट सर्किटमुळे जळून खाक झाला. यात साधारण दहा ते बारा लाखाचे नुकसान झाले आहे.

सदर घटनेची माहिती कळताच सदर शेतकरी शेतात पोहचतो तोपर्यंत ऊस जळून खाक झाला होता. तरी तात्काळ नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी यांच्याकडून करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या