Thursday, April 25, 2024
Homeनगरअतिउच्च दाबाची वीजवाहिनी तुटल्याने 25 एकर ऊस जळून खाक

अतिउच्च दाबाची वीजवाहिनी तुटल्याने 25 एकर ऊस जळून खाक

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

तालुक्यातील जांभळी शिवरात अतिउच्च दाब असणार्‍या 132 के.व्ही. होल्ड टॉवर लाईनची मुख्य वीज वाहिनी तुटून सुमार 25 एकर शेतातील तोडणीस आलेला ऊस जळून खाक झाला आहे.

- Advertisement -

रविवार (दि.27) रोजी ही घटना दुपारी साडेबारा एकच्या सुमारास घडली आहे.

वीज वितरण कंपनीची मुख्य 132 केव्ही होल्ड असलेली टॉवर लाईन वरील तार तअचानक तुटून बॉम्ब फुटल्यासारखा मोठा स्फोट होऊन आवाज झाला आणि आगेने रुद्र रूप धारण केले. हा आवाज ऐकून परिसरातील ग्रामस्थानी घटनास्थळी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. कृष्णा अश्रूबा आव्हाड, नवनाथ नारायण आव्हाड या प्रत्येक्षदर्शीनी ही घटना घडल्याची पहिली.

जांभळी येथील ऊस उत्पादक शेतकरी किसन महादेव आव्हाड, महादेव सुखदेव आव्हाड, नवनाथ नारायण आव्हाड, भगवान निवृत्ती आव्हाड, राधकीसन निवृत्ती आव्हाड, दिलीप अश्रूबा आव्हाड यांच्या मालकीचा 25 एकर ऊसाचे क्षेत्र जाळून खाक झाले आहे. एकरी 60 ते 70 टन ऊसाचे उत्पादन यातून मिळते. येत्या आठ दिवसानंतर हे सर्व ऊसाचे क्षेत्र तोडणीसाठी आले असतांना अशी घटना घडल्यामुळे शेतकर्‍याला मोठा आर्थिक भुर्दंड बसणार आहे.

या घटनेने शेतकर्‍यांवर पुन्हा एक संकट ओढवले आहे.कधी दुष्काळ,तर कधी हवामानाचा फटका बसून शेतीतील पीक शेतकर्‍यांच्या हाताशी लागत नाही. अनेक अडचणींवर मात करून मोठ्या कष्टाने शेतीत घाम गाळून बळीराजा शेत माल पिकवतो असे संकट आल्यावर तो होताच होतो.

त्वरित नुकसानभरपाई या संबधित शेतकर्‍यांना मिळावी अशी मागणी माजी पंचायत समितीचे सदस्य भगवान आव्हाड, आम आदमी पार्टीचे जिल्हा संघटक किसन आव्हाड,तुकाराम आव्हाड,राजू आव्हाड,नवनाथ आव्हाड यांनी नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.महसूल विभागाकडून पंचनामे करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या