Thursday, April 25, 2024
Homeजळगावपहूरमध्ये 15 लाखांची घरफोडी

पहूरमध्ये 15 लाखांची घरफोडी

पहूर, ता.जामनेर – Jamner – Pahur :

येथील ख्वाजानगर भागात रहाणारे भाजपा तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष शे.सलीम शेख गणी यांच्या बंद असलेल्या घरातील

प्राथमिक चौकशीवरून जवळ्च्या व्यक्तीने रोकड लंपास केली असावी यांच्या तपासकामी पथके नियुक्त करण्यात आली आहे. श्वान पथक, फिंगर प्रिंट तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे.

- Advertisement -

– ईश्वर कातकडे, उपविभागीय अधिकारी

मुख्य दरवाजा काही तरी अवजाराने उघडण्याचा प्रयत्न करून किचन दरवाजाच्या आतील कोंडा तोडून हॉलमधील लोखंडी कपाटाचा दरवाजा उघडून लॉकरचा पत्रा वाकवून त्यातील 15 लाख 8 हजार रुपये लंपास करून घरफोडी झाल्याचा प्रकार दिनांक 9 ऑक्टोबर रात्री 12.30 ते संध्याकाळी 6.45 वाजेदरम्यान उघडकीस आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पहूर येथील ख्वाजानगर भागात रहाणारे भाजपा तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष शे.सलीम शेख गणी हे काल सकाळी 11 वाजता कुटुंबियांनसह जळगाव येथे नातेवाईकांकडे गेले होते. सलीम शेख गणी यांनी प्लॉटचा व्यवहार केल्याने पंधरा लाखांची रक्कम घरात होती. ते जळगाव येथे मुक्कामी होते. त्यांनी आपले, लहान बंधू सद्दाम शेख गणी यांना सांगितले की, घराकडे चक्कर मारून ये त्यानुसार त्यांनी रात्री 12 ते 12.15 वाजेदरम्यान पाहणी करून घर सुरक्षित असल्याचे सांगितले व त्यानंतर शे.सद्दाम, शे.रईस, शे.रफीक हे तिघेही कार्यक्रमासाठी जळगाव येथे गेले. दरम्यान शे.सलीम शेख गणी हे कुटुंबियांसह सायंकाळी घरी पोहचले असता त्यांना घराच्या किचनचा दरवाजा उघडा दिसला. आत प्रवेश केला असता, कपाटाकडे गेल्यावर त्यातील असलेले पंधरा लाखांची रोकड न दिसल्याने त्यांना हादरा बसला. त्यानंतर घटनास्थळी पहूर पोलीस स्टेशनचे पी.एस.आय.किरण बर्गे, पी.एस.आय.अमोल देवडे, पी.एस.आय.चेडे, शशिकांत पाटील दाखल झाले. त्यानंतर अवघ्या तासाभरात पाचोरा विभागाचे उपविभागीय अधिकारी ईश्वर कातकडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नीता कायते यांनी घटनास्थळी पाहणी करून चौकशी केली. दरम्यान या घरफोडीने परिसरातील रहिवासी भयभीत झाले असून, याअगोदर झालेल्या अनेक चोर्‍यांचा तपास न लागल्याने व आज रोजी झालेल्या घरफोडीचा तपास जलदगतीने व्यक्त व्हावा, अशी अपेक्षा जनतेची असली तरी पहूर पोलिसांना या अज्ञात चोरट्यांनी केलेल्या घरफोडीचा तपास एक आव्हान आहे. दरम्यान रात्री उशिरा श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान शेख सलीम शेख गणी यांनी पहूर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध भाग-5, गु.र.नं.258/2020 भा.दं.वि.कलम 454, 457, 38 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पाचोरा विभागाचे उपविभागीय अधिकारी ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक अमोल देवडे हे करीत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या