Friday, April 26, 2024
Homeनाशिकनवीन नाशिक : दत्तनगर मध्ये घरफोडी

नवीन नाशिक : दत्तनगर मध्ये घरफोडी

नवीन नाशिक l New Nashik (प्रतिनिधी) :

चुंचाळे शिवारातील दत्तनगर मधील कारगिल चौकातील एका घरातून अज्ञात चोरट्याने दोन गॅस सिलिंडरची चोरी केली आहे.

- Advertisement -

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिलीपकुमार जयस्वाल (वय २२, रा. दत्तनगर, कारगिल चौक, चुंचाळे, अंबड) यांच्या घरातून पाच हजार रुपये किमतीचे दोन सिलिंडर व रोख दोन हजार रुपये, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड, आधारकार्ड, पहिली ते बीएससीपर्यंतचे मार्कसीट चोरून नेले.

या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून , पोलीस हवालदार बेंडाळे अधिक तपास करीत आहेत .

- Advertisment -

ताज्या बातम्या