घरफोडी करणारे चोरटे कर्जत पोलिसांनी केले जेरबंद

कर्जत |वार्ताहर| Karjat

पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी कर्जत येथील पदभार स्वीकारल्यानंतर सातत्याने गुन्हेगारी करणार्‍यांवर वचक ठेवून आहे. अवैध व्यवसाय त्यांच्यावर कारवाई बरोबरच इतर गुन्हेगारी घटकांवर कायद्याचा

अंकुश ठेवून पोलीस प्रशासन अतिशय सुरळीतपणे सामान्य जनतेसाठी सुरू असल्याचे दिसून येते. 20 एप्रिल रोजी विशाल नारायण दळवी (रा. शहाजी नगर कर्जत), यांनी फिर्याद दिली की, राहत्या घरात कुणीतरी अज्ञात चोरट्याने रात्री घराचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश करून 10 हजार रुपये किमतीचा एमआय कंपनीचा मोबाईल व रोख 2 हजार रुपये चोरून नेले. या गुन्ह्याचा शोध घेण्याकरिता कर्जत पोलिस स्टेशन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी अधिकारी व पोलिस अंमलदार यांना सूचना व मार्गदर्शन करून गुन्हा उघड करण्याबाबत आदेशीत केले होते.

तपास चालू असताना सदरचा गुन्हा हा श्रीगोंदा येथील आरोपींनी गोपनीय माहिती मिळाली. त्यावरून 20 एप्रिल रोजी विकी विश्वास काळे (रा. श्रीगोंदा) यास ताब्यात घेऊन चोकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले. त्याच्याकडून मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच त्याचा जोडीदार नंद्या पायथ्या पवार, (श्रीगोंदा) यास 24 एप्रिल रोजी श्रीगोंदा येथून अटक करण्यात आली आहे. कर्जत पोलिस स्टेशनचे चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक, सपोनी सुरेश माने, पोलिस जवान अंकुश ढवळे, पांडुरंग भांडवलकर, श्याम जाधव, सुनील खैरे यांनी केली असून पुढील तपास पोलीस हवालदार सलीम शेख करत आहेत.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *