मोटरसायकलीच्या डिकीतून सहा लाखाची रोकड लंपास करणार्‍या गँगमधील बंटी-बबलीला अटक

jalgaon-digital
2 Min Read

शहादा Shahada । ता.प्र.-

शहरातील डोंगरगाव रस्त्यानजीक दोन महिन्यांपूर्वी एका व्यापार्‍याच्या (merchant) मोटरसायकलीच्या डिक्कीतून (Dikki motorcycle) 6 लाख 33 हजार रुपयाची रोकड काढून (Withdraw cash) फरार झालेल्या बंटी-बबली गँगमधील (Bunty-Bubbly Gang) बबली (Bubbly) अर्थात अर्चनाबेन अमितभाई राठोड हिला गुप्त माहितीच्या आधारावर शहादा पोलिसांनी कुबेरनगर-अहमदाबाद येथून मोठ्या शिताफीने अटक (arrested) केली आहे. त्यांना आज न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. उर्वरित तीन फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

ही घटना 13 मे 2022 रोजी शहरातील डोंगरगाव रस्त्यानजीक श्रीहरी हॉस्पिटल समोर दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडली होती. मोटारसायकलीने जाणार्‍या खेतिया येथील व्यापारी सुभाष कोठारी यांना मागून दोन मोटारसायकलींवर येत बंटी-बबली बोलबच्चन गँग मधील चार जणांनी गाडीला कट का मारला असे सांगून भांडण सुरु केले. बबलीने त्या सुभाष कोठारीची चावी काढून घेतली व संधी साधत मोटरसायकलच्या डिक्कीतून पिशवीत असलेली 6 लाख 33 हजार 140 रुपयांची रोकड घेऊन पसार झाले.

त्यानंतर व्यापार्‍याचे डिक्कीकडे लक्ष गेले असता डिक्की उघडी दिसली व त्यातील रक्कम लंपास झाल्याचे लक्षात आले. या घटनेने पोलिस प्रशासनही हादरून गेले होते. घटनेला दोन महिने उलटल्यानंतर पोलीस उपअधीक्षक श्रीकांत घुमरे, पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सदर घटनेतील आरोपी अहमदाबाद येथे असल्याची माहिती मिळाली.

उपनिरीक्षक जितेंद्र पाटील, पोलिस कर्मचारी नागलोत, शिरसाठ, निर्मला पावरा यांच्या पथकाने अहमदाबाद पोलिसांच्या सहकार्याने या गँगमधील बबली अर्चनाबेन अमितभाई राठोड हीस तिच्या राहत्या घरातून मोठ्या शिताफीने अटक केली. या दरम्यान तिने पळून जाण्याचाही प्रयत्न केला.

घटनेतील तिचे सहकारी बंटी पप्पू इंद्रेकर (वय 26), रोजनिश धर्मु गुमाणे (वय 38), सतीश ललिया गुमाने (वय 40) रा.कुबेरनगर-अहमदाबाद हे तिघेही फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

बबली बरोबर बंटीही पोलिसांच्या जाळ्यात

या घटनेतील दुसरा आरोपी बंटी अर्थात पप्पू इंद्रीकर ( रा .कुबेरनगर, अहमदाबाद ) हा बेटावद ता शिंदखेडा येथे आल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र पाटील यांनी त्यांच्या पथकासह सापळा रचुन त्यास आज सायंकाळी अटक केली.त्यास उद्या दि 20 रोजी न्यायालयात हजर केले जाणार आहे या घटनेतील बोल बच्चन गँगचे बंटी व बबली अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत.अन्य दोन आरोपींचा शोध सुरू आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *