कोपरगावच्या तहसीलदारांना माजी नगराध्यक्षांच्या दमबाजीने खळबळ

jalgaon-digital
2 Min Read

कोपरगाव (प्रतिनिधी) – कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांचे उच्च न्यायालयाशी संबंधित महत्त्वाचे काम चालू असल्याने त्यांनी काल दुपारी दोनच्या सुमारास येणार्‍या अभ्यागतांच्या भेटीगाठी काही काळ बंद ठेवल्याचा राग येऊन कोपरगावच्या एका माजी नगराध्यक्ष असलेल्या व्यक्तीने तहसीलदारांना चक्क तुमच्याकडे पाहून घेईन असा दम भरल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की, कोपरगावच्या तहसीलदारपदी गत वर्षी योगेश चंद्रे यांची नियुक्ती झाल्यापासून तालुक्यातील बर्‍यात कामांचा निपटारा त्यांनी केल्याचे दिसून येत आहे. वर्तमानात ते सकाळी आपल्या कार्यालयात लवकर येऊन तब्बल बारा-तेरा तास काम करणारे अधिकारी म्हणून त्यांचा लौकिक आहे. शिवाय भ्रष्टाचार करणार्‍यांचा बर्‍याच प्रमाणावर त्यांना तिटकारा येतो, असा बर्‍याच जणांचा अनुभव आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराला बर्‍याच प्रमाणात सोकावलेले अनेक कर्मचार्‍यांची पाचावर धारण बसलेली आहे.

त्यांनी शीव रस्ते, पांदण रस्ते, रस्त्यांचे वाद, दिवाणी दावे, त्यांच्याकडील सुनावण्या आदींसह नियमित कामांना गती दिली आहे. त्यामुळे यापूर्वीचे तहसीलदार राहुल जाधव यांची आठवण घेण्यालायक अधिकारी बर्‍याच दिवसांनी कोपरगावच्या नागरिकांना मिळाला आहे. म्हणून सर्वच अधिकारी कर्मचारी सरळ झाले. रामराज्य आले असे म्हणता येणार नाही.

मात्र तरीही कोपरगाव तहसील कार्यालयात या पूर्वी निर्माण झालेली बेदिली बर्‍याच प्रमाणात कमी झाली असे म्हणण्यास जागा निर्माण झाली असताना काल दुपारी दोनच्या सुमारास कोपरगावात आपल्या घराण्यात दोन पिढ्या नगराध्यक्षपद भूषविलेल्या व आपल्या पत्नीलाही ही संधी मिळालेली असताना अशा जबाबदार व्यक्तीकडून जबाबदारीने वागण्याची अपेक्षा करणे कोणाही अधिकारी व सामान्य कर्मचारी व सामान्य नागरिकाने केली असल्यास त्यास वावगे म्हणता येणार नाही.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *