Friday, April 26, 2024
Homeनगरबैलगाडा शर्यत आली अंगलट; 14 जणांवर गुन्हे दाखल

बैलगाडा शर्यत आली अंगलट; 14 जणांवर गुन्हे दाखल

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

पारनेर-जुन्नर तालुका हद्दीवर असणार्‍या तालुक्यातील काताळवेढा गावात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करुन

- Advertisement -

रविवारी (दि. 13) बैलगाडा शर्यतीचे आयोजन केल्यामुळे आयोजकांसह 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पारनेर तालुक्यातील 12 तर जुन्नर तालुक्यातील वाळवणे येथील दोघांचा समावेश आहे. या सबंधीची फिर्याद पोलीस नाईक शामसुंदर विश्वनाथ गुजर यांनी दिली आहे. फिर्यादीवरून आरोपी सुभाष रामदास गाजरे, बाबाजी रामदास गाजरे, युवराज रामदास गाजरे, विलास पांडुरंग भाईक, संभाजी सुखदेव भाईक, सोमनाथ पांडुरंग भाईक, धर्मनाथ रघुनाथ भाईक, बाळू बबन गुंड, खंडू कचरू भाईक, विजू दादाभाऊ गाजरे, प्रकाश किसन घटाटे (सर्व रा. काताळवेढा, ता. पारनेर), ज्ञानदेव जनाजी साबळे, विशाल धनाजी साबळे (दोघे रा. नळवणे, ता. जुत्रर), सुरेश भीमा काकडे (रा. पळसपूर, ता. पारनेर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काताळवेढा गावच्या शिवारात गावापासून एक किलो मीटर अंतरावर माळरानाच्या चढावर 13 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजेच्या दरम्यान बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. काताळवेढा येथे पारनेर व जुत्रर तालुक्यातील 14 आरोपींनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग करून बैलगाडा शर्यत लावून जनावरांना क्रूरतेने वागणूक दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, सहाय्यक फौजदार शिवाजी कडूस करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या