Friday, April 26, 2024
Homeनगरसराफाचे दुकान फोडून चोरट्यांनी केली पाच किलो चांदी व दोन ग्रॅम सोन्याची...

सराफाचे दुकान फोडून चोरट्यांनी केली पाच किलो चांदी व दोन ग्रॅम सोन्याची चोरी

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर शहरातील राम मंदिराजवळील अनिरुद्ध ज्वेलर्स हे दुकान पहाटे अज्ञात चोरट्यांनी फोडले असून दुकानातून सुमारे पाच किलो चांदी व दोन ग्रॅम सोने गायब केले असल्याने व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

शहरातील श्रीराम मंदिर रस्त्यावरील महाले यांच्या मालकीचे अनिरुद्ध ज्वेलर्स हे दुकान मंगळवारी पहाटे अज्ञात चोरट्यानी फोडून त्यातून पाच किलो 677 ग्रॅम वजनाची चांदीची आभूषणे, दोन ग्रॅम वजनाचे सोने चोरून नेले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तीन चोरटे दिसत असून चेहरे झाकलेले आहेत. या दुकानात रात्री तीन अज्ञात चोरट्यांनी ही धाडसी चोरी केल्याचे सीसी टीव्ही फुटेजेवरून लक्षात आले आहे.

दुकानातील सोने ठेवलेली तिजोरी चोरट्यांना उघडली नसल्याने चांदीचे आभूषणे घेऊनच ते तेथून पसार झाले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील करीत आहेत. दरम्यान मंगळवारी सकाळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपअधीक्षक संदिप मिटके, पोलीस निरीक्षक संजय सानप, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके आदींसह श्वान पथक व ठसे तज्ञांनी तपासणी केली. याप्रकरणी अनिरुद्ध नारायण महाले यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या