Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशBulli Bai App चा मास्टरमाईंड पोलीसांच्या ताब्यात!

Bulli Bai App चा मास्टरमाईंड पोलीसांच्या ताब्यात!

दिल्ली | Delhi

बुली बाई अ‍ॅपने (Bulli Bai App) खळबळ उडवून दिली असून मोठा वाद निर्माण झाला आहे. पोलिसांकडूनही याप्रकरणी सध्या वेगाने कारवाई सुरु आहे. दरम्यान बुली बाई अ‍ॅप प्रकरणी दिल्ली पोलिसांना मोठे यश आले आहे.

- Advertisement -

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या आयएफएसओ टीमने मुख्य आरोपीला ताब्यात घेतले आहे. आयएफएसओ टीमने मुख्य आरोपीला आसाममधून अटक केली आहे. नीरज बिष्णोई असे त्या नावाच्या तरुणाचे नाव असून तो या संपूर्ण प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याची माहिती डीएसपी केपीएस मल्होत्रा यांनी दिली आहे.

दरम्यान या प्रकरणात मुंबई पोलिसांनी आत्तापर्यंत तीन जणांना अटक केली आहे. यातली पहिली अटक बेंगळुरूमधून २१ वर्षाच्या विशाल कुमार झा या तरुणाची झाली. दुसरी अटक उत्तराखंडमधून एक १८ वर्षीय श्वेता सिंह नावाच्या तरुणीची झाली. २१ वर्षीय मयंक प्रदीपसिंह रावत यालाही अटक केली असून हे तिघे एकमेकांच्या संपर्कात असल्याचं समोर आलं आहे.

या अ‍ॅपमध्ये काय आहे?

Bulli Bai नावाच्या अ‍ॅपवर मुस्लिम महिलांना टार्गेट केले जात होते. अ‍ॅपवर त्यांच्याविरोधात घृणास्पद आणि घाणेरड्या गोष्टी लिहिल्या जात होत्या. वास्तविक, सुल्ली डील अ‍ॅपच्या धर्तीवरच बुली बाई अ‍ॅपवर काम केलं जात होतं. Sulli deal हे Github लाँच झालं होतं. तर बुली बाई देखील Github वरच लाँच झालेलं.

- Advertisment -

ताज्या बातम्या