Friday, April 26, 2024
Homeजळगावबेलव्हाळ येथे बिबट्याच्या हल्ल्यात बैल जखमी ?

बेलव्हाळ येथे बिबट्याच्या हल्ल्यात बैल जखमी ?

सुनसगाव Sunsagaon ता भुसावळ वार्ताहर –

येथून जवळच असलेल्या बेलव्हाळ (Belwal) येथील शेतकऱ्याच्या बैलावर (Bull ) ( गोऱ्हा ) बिबट्याने हल्ला (leopard attack) केला असता गोऱ्हा गंभीर जखमी (njured) झाला आहे. विशेष म्हणजे दोन महिन्यांपूर्वी घटना घडली त्याच ठिकाणी एक गाय बिबट्याने फस्त केली होती.

- Advertisement -

या बाबत माहिती अशी की , नेहमी प्रमाणे सुनसगाव रस्त्यावर युवराज मंगा नारखेडे यांनी आपल्या खळ्यात गुरेढोरे बांधलेले होते मात्र दि १२ जुलै रोजी रात्री ८ वाजे दरम्यान बिबट्याने खळ्यात बांधलेल्या गोऱ्ह्यावर हल्ला केला असतं इतर जनावरे ओरडू लागली तसेच शेजारी बांधलेल्या गायीने तर दोर तोडून सैरावैरा पळत सुटली.

गुराढोरांचा आवाज ऐकताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली असता गर्दी पाहून बिबट्याने पळ काढल्याचे सांगितले. या हल्ल्यात गोऱ्हा जखमी झाला आहे.याच ठिकाणी दोन तीन महिन्यांपूर्वी समाधान कोळी यांची गाय बिबट्याने फस्त केली होती .

आता पर्यंत बेलव्हाळ येथे गुरांढोरांवर हल्ला झाल्याची ही सातवी घटना आहे.

या बाबत वनविभागाच्या कुऱ्हा पानाचे येथील अधिकाऱ्यांना माहिती दिली असता त्या ठिकाणी गुरेढोरे बांधू नका असे सांगितले तसेच भरपाई मिळण्यासाठी एकही अधिकारी सहकार्य करीत नसल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.त्यामुळे घटनास्थळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जाऊन पाहणी करावी तसेच पशुवैद्यकीय अधिकारी यांनी उपचार करावेत अशी मागणी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या