कौठे मलकापुरात बैलगाडा शर्यतीचा थरार

jalgaon-digital
4 Min Read

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

राज्यात बैलगाडा शर्यतींना बंदी (State Bull cart races banned)आहे, असे असतानाही संगमनेर तालुक्यातील (Sangamner Taluka) कौठे मलकापूर (Kauthe Malkapur) शिवारात देवी मंदिरासमोर करोना नियमांना (Covid Rule) हरताळ फासत जमाव जमवून बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते. शर्यतीची माहिती (Races Information) मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, पोलीस (Police) आल्याचा सुगावा लागताच आयोजकांसह प्रेक्षकांनी पळ काढला.

घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यावरून 46 जणांविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात (Ghargav Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर दोन बैलांच्या जोड्यांसह सहा लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

करोना प्रादुर्भावामुळे जमावबंदी व शर्यतीवरील बंदीचे (Race ban) नियम धाब्यावर बसवून स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून रविवारी सकाळी 11 वाजता कौठे मलकापूर देवी मंदिरासमोर बैलगाडा शर्यत (Bull cart races) घेण्यात आली. शर्यतीचे आयोजन दोन हजार रुपये टोकन लावून करण्यात आले होते. या शर्यतीची माहिती घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांना मिळाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धीरज राऊत, पोलीस हवालदार सुरेश टकले, दशरथ वायाळ, विशाल कर्पे यांनी कौठे मलकापूर येथे धाव घेतली. पोलीस आल्याचा सुगावा लागताच शर्यत पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांनी तेथून पोबारा केला.

यावेळी पोलिसांनी घटनास्थळावरून एक पिक अप क्रमांक एमएच 14 एफटी 0700, दोन बैलांची जोडी, बैलगाडा शर्यतीचा छकडा, बैलाला पळविण्याकरिता टोचण्यासाठी खिळा असलेली पातळ बांबूची काठी असा सहा लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याप्रकरणी नितीन उत्तम पावडे (रा. पाचघर, ता. जुन्नर), नितीन उत्तम धोंडकर (रा. पाचघर, ता. जुन्नर), अक्षय बबन डुंबरे (रा. ओतूर), श्रीकांत बाळू मंडलिक (रा. डिंगोर, ता. जुन्नर), शिवाजी रामभाऊ कारंडे, सचिन उत्तम पानसरे (रा. ओतूर, ता. जुन्नर, जि. पुणे) या सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

बैलगाडा शर्यत आयोजित करणार्‍या शिवाजी कारंडे यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता बैलगाडा शर्यत आयोजक लक्ष्मण गजाबा गिते (रा. कौठे मलकापूर, ता. संगमनेर), राकेश खैरे, सुरेश लक्ष्मण चितळकर (रा. साकूर), बाळासाहेब बबन महाकाळ (रा. मांदारणे, ता. जुन्नर), राहुल काळे (ओतुर), संजय भागा देवकाते (रा. साकुर), चैतन्य पडवळ (रा. ओतुर), सतीश रिजू खेमनर (रा. बिरेवाडी), भाऊसाहेब आबु खेमनर (रा. हिरेवाडी), दादासाहेब चिमाजी खेमनर (रा. हिरेवाडी), विशाल सगाजी खेमनर (रा. नान्नरवस्ती), शुभम शंकर नान्नर (रा. नान्नर वस्ती), अमोल साहेबराव नान्नर (रा. नान्नरवस्ती), बाळु साहेबराव कुदनर (रा. शिंदोडी), प्रतिक संतोष ठोंबरे (रा. जांबुत), राहुल गंभीरे (रा. कौठे मलकापूर) यासह 20 ते 25 हे फरार आहेत.

याबाबत पोलीस कॉन्स्टेबल विशाल कर्पे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा रजिस्टर नंबर 195/2021 भारतीय दंड संहिता 188, 269 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 119, सह प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 चे कलम 11(1) प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरेश टकले करत आहेत.

बैलगाडा शर्यतीसाठी पुणे जिल्ह्यातील आजी-माजी खासदार सरसावले

राज्यातील बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवावी, अशी मागणी राज्यातील बैलगाडा मालकांनी केली होती. या मागणीबाबत पुणे जिल्ह्यातील चाकण चौकात आंदोलनही झाले होते. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी याबाबत पुणे जिल्ह्यात आंदोलन केले होते. त्यानंतर विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी ओझर, ता. जुन्नर येथे गाडा मालक, बैलगाडा शर्यत संघटना पदाधिकार्‍यांची बैठक घेतली होती. बैलगाडा शर्यती सुरू करण्याबाबत आपण केंद्र पातळीवर प्रयत्न करू असे आश्वासन त्यांनी बैठकीत दिले होते. स्वातंत्र्यदिनी झालेल्या संगमनेर तालुक्यातील कौठेमलकापूर शिवारातील बैलगाडा शर्यतीत सर्वाधिक बैलगाडा मालक हे पुणे जिल्ह्यातील होते. सुमारे 50 बैलगाडा मालकांनी शर्यतीत सहभाग घेतला होता.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *