Friday, April 26, 2024
Homeनगरभूईकोट किल्ल्याच्या तटबंदीला तडा

भूईकोट किल्ल्याच्या तटबंदीला तडा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

530 वर्षाच्या ऐतिहासीक भूईकोट किल्ल्याच्या संरक्षक कठड्याची भिंत कोसळली आहे.

- Advertisement -

त्यामुळे तटबंदीलाही धोका निर्माण झाला आहे. हा ऐतिहासीक ठेवा जतन करण्याची मागणी हरियाली संस्थेने जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.

यंदा मुबलक पावसाने खंदकात व खंदकाबाहेर मोठ्या प्रमाणात पाणी साचले व मुरले. त्यामुळे पाच नंबरच्या बुरुजाजवळील खंदकाची 8 फूट रुंद आणि 55 फूट लांब असलेली भिंत व त्याचे कठडे खचून खंदकात 25 फूट खाली कोसळले आहे.

ऐतिहासिक भूईकोट किल्ल्याच्या खंदकाची विशाल व मजबूत भिंत आणि कठडा अचानक खचून खंदकामध्ये पडला. निजाम अहमद बादशहाने 530 वर्षांपूर्वी 1 मैल 80 यार्ड परिघ असलेली तटबंदी आणि 22 बुरूजं असलेला हा मजबूत भूईकोट किल्ला बांधला. इतके वर्ष किरकोळ पडझड वगळता हा किल्ला व किल्ल्याची तटबंदी, बुरूजं, खंदक, भिंत, कठडे हे उत्तम स्थितीत होते.

यंदाच्या पावसाने मात्र कठडे खचून पडले आहेत. राज्य सरकार व तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांच्या पुढाकाराने 2011 मध्ये खंदकाच्या भिंतीवर दगडाचे मजबूत कठडे बांधण्यात आले. इतके दिवस ते अबाधित आणि सुस्थितीत होते.

दुर्दैवाने त्याची आता पडझड सुरू झाली आहे. या ऐतिहासिक वास्तुचे संवर्धन व संरक्षण होणे गरजेचे असल्याने भिंतीची व कठड्यांची तत्काळ दुरुस्ती करण्याची आवश्यकता असल्याची मागणी हरियालीचे अध्यक्ष सुरेश खामकर, विष्णू नेटके, संदीप पावसे, ठाकुरदास परदेशी, योगेश गायकवाड, दीपक परदेशी, तुलसीभाई पालीवाल, रंगनाथ सुंबे, संजय राहुरकर यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या