Tuesday, April 23, 2024
Homeनगरम्हैशी चोरणार्‍या टोळीतील तिघांना अटक

म्हैशी चोरणार्‍या टोळीतील तिघांना अटक

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

पाथर्डी तालुक्यातील मोहोज देवढे येथील चोरीला गेलेल्या दोन म्हशीपैंकी एक म्हैस पोलिसांनी हस्तगत केली आहे. दुसरी म्हैस हिरापूर (जि.बीड) येथील बाजारात चोरट्यांनी विकली आहे. तिघांना गुरुवारी पोलिसांनी न्यायलयासमोर हजर केले असता तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायाधीश अश्वीनी बिराजदार यांनी दिले.

- Advertisement -

मोहोज देवढे येथील नारायण भगवान बेळगे यांच्या घराच्या पाठीमागील गोठ्यातून दोन म्ह्शी 1 ऑगस्ट 2022 च्या रात्री साडे दहा ते एक वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी चोरून नेल्या होत्या. 2 ऑगस्ट 2022 रोजी बेळगे यांनी पोलिसात म्हशी चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली होती. पाहुण्याकडे चोकशी करीत असतांना पिपळगाव टप्पा येथील एका टेम्पो चालकाने मीच हे भाडे सोडले असल्याचे सांगून ज्यांनी म्हशी चोरल्या त्यांनी भाड्याचे पैसे टेम्पो चालकाला ऑनलाईन पाठविले होते. त्यावरुन पोलिसांनी म्हशी चोरणार्‍यांचा माग काढला.

आजीनाथ बाळू मेरड, (रा. मेरडवाडी ता. आष्टी), प्रकाश जालींदर ठोंबरे (रा. मांगवाडी ता.शिरुर), पांडुरंग भाऊराव गोयकर (रा. बहीरवाडी, ता.पाथर्डी) या तिघांना पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सोमीनाथ बांगर, अनिल बडे, लक्ष्मण पवार, के.के.कराड, किरण बडे या पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांनी अटक केली. आरोपींनी एक म्हैस हिरापूर (जि.बीड) येथील जनावरांच्या बाजारात विकली व भगवानगडाच्या डोंगरात बांधून ठेवली होती.

भगवान गडाच्या पायथ्याशी असलेली म्हैस पोलिसांनी ताब्यात घेतली व नारायण बेळगे यांच्या ताब्यात दिली आहे. टेम्पो चालकांने टेम्पो पंधरा दिवसांपूर्वी खरेदी केलेला आहे. नवीन भाडे होते त्यांनी भाडे केले. मात्र संशय आल्याने स्वतःच माहिती देऊन गुन्हा उघड केला आहे. पुढील तपास तपास पोलीस हवालदार सोमीनाथ बांगर करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या