Saturday, April 27, 2024
Homeदेश विदेशBudget session 2022 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण मांडणार आर्थिक सर्वेक्षण अहवाल

Budget session 2022 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण मांडणार आर्थिक सर्वेक्षण अहवाल

दिल्ली | Delhi

आज सोमवारपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. करोना संकटातून सावरलेल्या अर्थव्यवस्थेचे प्रगती पुस्तक अर्थात आर्थिक पाहणी अहवाल थोड्याच वेळात लोकसभेत सादर केला जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन वर्ष २०२१-२२ चा आर्थिक पाहणी अहवाल सादर करतील.

- Advertisement -

Budget 2022 : उद्या अर्थसंकल्प, जाणून घ्या अर्थसंकल्पाबाबत महत्त्वाच्या गोष्टी

करोनाच्या तिसऱ्या लाटेत संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन घेतले जात असून, गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही अधिवेशनाचे कामकाज दोन सत्रांमध्ये होईल. २ ते ११ फेब्रुवारी या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वार्धातील सभागृहांचे कामकाज प्रत्येकी पाच तास होणार आहे. राज्यसभेचे कामकाज सकाळी ९ ते दुपारी २ आणि लोकसभेचे कामकाज दुपारी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत चालेल.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर सोमवारी आर्थिक पाहणी अहवाल संसदेत मांडला जाईल. १ फेब्रुवारी रोजी नेहमीप्रमाणे सकाळी ११ वाजता लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करतील. त्यामुळे सोमवार आणि मंगळवार या दोन्ही दिवशी शून्य प्रहर व प्रश्नोत्तराचा तास होणार नाही.

आर्थिक पाहणी अहवाल म्हणजे काय?

अर्थसंकल्पाच्या माध्यमातून देशाच्या येत्या आर्थिक वर्षाचा अंदाज मांडण्यात येतो. पण आर्थिक पाहणी अहवाल हा गेल्या आर्थिक वर्षाचा लेखाजोगा असतो. त्यामध्ये आपल्या अर्थव्यवस्थेने कशा प्रकारची कामगिरी केली हे सांगितलं जातं. हा आर्थिक पाहणी अहवाल सरकारने संसदेत मांडावा असा कुठल्याही कायद्यात किंवा घटनेत उल्लेख नाही. ही एक परंपरा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या