Sunday, May 5, 2024
Homeनाशिकअर्थसंकल्पीय सभा ऑफलाईन घेण्यास प्रशासनाचा खोडा

अर्थसंकल्पीय सभा ऑफलाईन घेण्यास प्रशासनाचा खोडा

नाशिक । प्रतिनिधी

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा ऑनलाईन झाल्यानंतर किमान अर्थसंकल्पीय सभा प्रत्यक्ष सभागृहात घेण्याची जोरदार मागणी सदस्यांनी केली आहे. ही मागणी लक्षात घेऊन पदाधिकार्‍यांनीही सभा ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन घेण्याची जयत तयारी केली असताना प्रशासन मात्र याला खोडा घालत असल्याचा आरोप सदस्यांकडून होत आहे.यामुळे सदस्य, पदाधिकारी आणि प्रशासन यांच्यात या मुद्यावरून चागलाच कलगीतुरा रंगणार अशी चिन्हे आहेत.

- Advertisement -

मागील आठवडयात सभेत प्रशासनाची झालेली नामुष्की पुन्हा होऊ नये तसेच सदस्यांची प्रश्न टाळण्यासाठी सभा सभागृहात घेण्यास प्रशासनाकडूनक विरोध केला जात असल्याक्सहा चर्चा आहे. प्रत्यक्षात सभा ऑफलाईन घेण्याबाबत कोणताही शासन आदेश नसताना, ऑनलाईन सभेचा प्रशासनाचा अट्टहास का असा प्रश्न सदस्यांकडून उपस्थित होत आहे.

जिल्हा परिषदेचे अर्थसंकल्प सादर करण्यासाठी बुधवारी (दि.10) सभा घेण्यास अर्थसमितीने केलेल्या शिफारशींवर अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर यांनी शिक्कामोर्तब केले. मात्र, अर्थसंकल्पीय ऑनलाईन सभेस सदस्यांना तीव्र विरोध केला आहे. वर्षाचा अर्थसंकल्प आहे यात विविध समित्यांचे बजेट असणार असून, कोणत्या योजनेसाठी किती निधी असणार आहे हे निश्चित केले जाणार आहे. त्यामुळे ऑनलाईन सभेत हे मुद्दे सदस्यांना कळणार नाहीत. यातच यंदा बजेट घटले आहे, सेस निधीही सदस्यांना मिळणार नाही. त्यामुळे योजनांच्या निधी मिळावा यासाठी स्दार अर्थसंकल्पावर प्रत्यक्ष सभागृहात चर्चा व्हावी,अशी सदस्यांची मागणी आहे.

ही मागणी सदस्यांनी पदाधि पदाधिकाऱ्यांंकडे केली आहे. बहुतांश पदाधिकाऱ्यांंचा कलही सभा ऑफलाईन घ्यावी असाच असल्याचे बोलले जात आहे. मात्र, प्रशासन सभा सभागृहात घेण्यास तयार नसल्याचे समजते. प्रशासनाने सभागृहात सभा झाल्यास करोनाचा बाऊ केल्याची चर्चा आहे. सदस्यांकडून प्रशासनाच्या कारभाराची लक्तरे काढतील या भितीने प्रशासन सभा सभागृहात घेण्यास घाबरत असल्याची चर्चा सेवक वर्गात आहे.

अर्थसंकल्पीय सभा प्रत्यक्ष सभागृहात घेण्यास कुठलीही हरकत नसून आमची पुर्णतः तयारी आहे. मात्र, प्रशासन तयार नाही. प्रशासनाला सभागृहात सभा घेण्याचे सांगितले तर ते ऐकत नाही. प्रशासन ऑनलाईनसाठीच आग्रही आहे.

डॉ. सयाजी गायकवाड, उपाध्यक्ष, जि.प.

सभा प्रत्यक्ष सभागृहात व्हावी अशी बहुतांश सदस्यांची मागणी असून आग्रह आहे. याबाबत प्रशासनाशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल.

बाळासाहेब क्षिरसागर, अध्यक्ष, जि.प

सभागृहात सभा घेण्यास अडचण येत असल्यास मंगल कार्यातील मोठया हॉलमध्ये कोरोनाचे नियम पाळून सभा घेणे शक्य आहे. प्रशासनाने ऑनलाईनचा हट्ट सोडून सदस्यांच्या मागणीनुसार ऑफलाईन सभा घ्यावी.

डॉ. आत्माराम कुंभार्डे, गटनेते, भाजप

- Advertisment -

ताज्या बातम्या