Saturday, May 11, 2024
Homeधुळेधुळ्यात साकारणार बुध्द विहार

धुळ्यात साकारणार बुध्द विहार

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

शहरात आ. फारूक शाह यांच्या प्रयत्नातून दीक्षाभूमीसारखे भव्य बुद्ध विहार साकारणार असून यासाठी राज्याच्या सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी 5 कोटींचा निधी मंजूर करून देण्याचे आश्वासन दिले आहे.

- Advertisement -

आज मुंबई मंत्रालय येथे आ. शाह यांनी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेत बुद्ध विहारासाठी 5 कोटी निधीची मागणी केली होती. त्यानुसार ही मागणी मान्य करत शहरात बुद्ध विहार साकारण्यासाठी 5 कोटी निधी उपलब्ध करून देऊ, असे सकारात्मक आश्वासन दिले.

शहरात मोठ्या प्रमाणात नवबौद्ध समाज वास्तव्यास आहे. मात्र एकही मोठे बुद्ध विहार शहरात नाही. यासाठी आ. शाह यांनी बुद्ध विहारासाठी निधीची मागणी केली होती.

शहरात महापालिका क्षेत्रात सुमारे 3 एकर जागेत हे बुद्ध विहार साकारणार असून दीक्षाभूमी नागपूरच्या धर्तीवर साकारणार्‍या बुद्ध विहारात विपश्यना गृह, भिक्कू निवास, कॉन्फरन्स हाँलचे बांधकाम अंतर्भूत असून उर्वरित जागेत उद्यान साकारले जाणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या