Saturday, April 27, 2024
Homeदेश विदेशपाकची कुरापत : भारतात घुसखोरीसाठी बनवला 150 मीटर लांब बोगदा

पाकची कुरापत : भारतात घुसखोरीसाठी बनवला 150 मीटर लांब बोगदा

नवी दिल्ली –

भारतीय सैन्याने भारतात घुसखोरीसाठी केलेल्या पाकच्या कुरापतीचा पर्दाफाश केला आहे. पाकिस्तानी दहशतवाद्यांचा भारतात

- Advertisement -

घुसखोरी करण्याचा डाव बीएसएफने उधळला आहे. बीएसएफच्या जवानांना भारत-पाकिस्तान सीमेवरील कठुआ येथील हिरानगर सेक्टरमध्ये एक 150 मीटर लांबीचा बोगदा आढळला आहे.

बीएसएफच्या अधिकार्‍याने सांगितले, जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेजवळ एक बोगदा आढळून आला आहे. हा बोगदा जवळपास 150 मीटर लांब असून, यामधून काही सिमेंटची पोती देखील हस्तगत करण्यात आली आहे. हे सिमेंट पाकिस्तानमधील कराची येथील आहे. तसेच हा बोगदा पाकिस्तानच्या पोस्टच्या अगदी समोरूनच खोदला गेला आहे.

या अगोदर देखील बीएसएफला ऑगस्ट महिन्यात जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यातील बेंगालड परिसरात 25 फूट खोल व 150 मीटर लांबीचा बोगदा आढळून आला होता. विशेष म्हणजे, या भूयारी मार्गाबरोबरच शक्करगढ, कराची लिहिलेल्या काही वाळूच्या पिशव्याही तिथं सापडल्या होत्या. त्या बोगद्यांपासून पाकिस्तानी लष्कराची चौकी 400 मीटर अंतरावर असल्याचंही लष्करानं सांगितलं होतं.

पाकिस्तानातून येणारे दहशतवादी अशा भूयारी मार्गांचा भारतात घुसखोरी करण्यासाठी वापर करतात. या बोगदा सापडल्यानं लष्कराला घुसखोरीचा मोठा डाव उधळून लावण्यात यश आलं आहे.

यापूर्वीही लष्कराला जम्मूमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर अशा प्रकारचे भूयारी मार्ग आढळून आले होते. 2012मध्ये सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना 400 मीटर लांबीचा बोगदा सापडला होता. हा बोगदाही सांबा सेक्टरमध्ये होता. तर दुसरा एक बोगदा पलनवाला सेक्टरमध्ये 2014 मध्ये आढळला होता. त्याच वर्षी सांबा जिल्ह्यातील छिल्लारी परिसरातही एक भूयारी मार्ग सापडला होता. हा भूयारी मार्ग भारतीय हद्दीत 25 मीटर आतापर्यंत करण्यात आलेला होता. त्याचबरोबर 2016 मध्ये पाकिस्तानातून येणारा बोगदा आरएस पूरा सेक्टरमध्येही सापडला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या