Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्याCrime News : सख्ख्या भावानेच केली १२ वर्षीय बहिणीची हत्या; कारण ऐकून...

Crime News : सख्ख्या भावानेच केली १२ वर्षीय बहिणीची हत्या; कारण ऐकून थक्क व्हाल

मुंबई | Mumbai

येथून जवळच असलेल्या उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar) सख्ख्या मोठ्या भावाने (Brother) लहान बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेत हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून निर्दयी भावाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे…

- Advertisement -

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगरमधील शांतीनगर परिसरात १२ वर्षीय मृत मुलगी ही तिचा मोठा भाऊ आणि वहिनी सोबत राहत होती. तर तिचे आईवडील गावी राहतात. या मुलीला (Girl) काही दिवसांपूर्वी पहिल्यांदाच मासिक पाळी (Menstrual Cycle) आली होती. ज्यामुळे तिचे कपडे हे रक्ताने माखले होते. कपड्यांवर रक्ताचे (Blood)डाग पाहून भावाने आपल्या लहान बहिणीला याबाबत विचारणा केली. पंरतु, वयाने अगदीच लहान असलेल्या या मुलीला आपल्या भावाला नेमके उत्तर देता आले नाही.

मुख्यमंत्री शिंदेंसह ‘या’ १६ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार; पाहा आमदारांची यादी

यावेळी मुलीच्या वहिनीने तिच्या नवऱ्याला (Husband) तुमच्या बहिणीचे कुठेतरी प्रेमसंबंध असून त्यातून शारीरिक संबंध ठेवल्याने हा रक्तस्त्राव होत असल्याची चुकीची माहिती दिली. त्यामुळे या मुलीचा मोठा भाऊ संतापला आणि तब्बल दोन दिवस त्याने बहिणीला लाथाबुक्क्यांनी मारहाण (Beating) केली. यानंतर त्याने तिसऱ्या दिवशी थेट स्टीलच्या पक्कडने बहिणीला मारहाण केली. ही मारहाण एवढी भीषण होती की, मारतामारता ती मुलगी थेट जमिनीवर कोसळली. त्यानंतर घाबरलेल्या भावाने तिला लगेचच रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

सत्तासंघर्षाच्या निकालाबाबत फडणवीसांचे मोठे विधान

दरम्यान, डॉक्टरांनी मयत मुलीचे शवविच्छेदन (Autopsy) केले असता त्यात तिच्या तोंडावर, मानेवर, पाठीवर चटके दिल्याच्या आणि मारहाणीच्या खुणा आढळून आल्या. त्यानंतर डॉक्टरांनी (Doctor) तात्काळ या घटनेची माहिती मध्यवर्ती पोलिसांना दिली असता पोलिसांनी (Police) या निर्दयी भावाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत त्याला अटक (Arrested) केली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या