Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकभाऊबीजेच्या दिवशी दुचाकी अपघातात भावाचा मृत्यू

भाऊबीजेच्या दिवशी दुचाकी अपघातात भावाचा मृत्यू

नाशिक | Nashik

भरधाव चारचाकीने दिलेल्या धडकेत भाऊबिजेच्या दिवशी युवकाचा मृत्यू तर युवती गंभीर जखमी झाल्याची घटना पंचवटीतल ड्रिम कॅसल सिग्नलवर घडली.

- Advertisement -

हर्षल संतोष जोशी (22, रा. जगताप तळा, नाशिकरोड) असे या घटनेत मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. तर त्याची मामेबहिण निशिगंधा कुलकर्णी (रा. हनमानवाडी) या घटनेत गंभीर जखमी झाली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार हर्षल हा त्याच्या मामे बहिणीबोबर दुचाकीवरून जात असताना भरधाव वेगात आलेल्या एमएच 15, ईएक्स 1422 या चारचाकी गाडीने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली.

यामध्ये हर्षल याच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. तर निशिगंधा गंभीर जखमी असून तीच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या