Tuesday, April 23, 2024
Homeधुळेनेते व कार्यकर्त्यांमधले दलाल मोडून काढणार!

नेते व कार्यकर्त्यांमधले दलाल मोडून काढणार!

धुळे Dhule । प्रतिनिधी

नेत्यांना भेटायचा ठेका (Agreement to meet the leaders) ठराविक टिकोजीरावांचा नाही. खरेतर नेते आणि कार्यकर्ते (Leaders and activists) यामधील दलालांना (brokers) आपण मोडून काढू. यासाठीच शरद पवार यांच्या या दौर्‍यात (tour of Sharad Pawar) 25-25 कार्यकर्त्यांचे गट तयार करुन त्यांची ओळख करुन देण्यात येणार आहे, असे राष्ट्रवादी काँगे्रसचे प्रदेशउपाध्यक्ष (Regional Vice President of Nationalist Congress) तथा माजी आ.अनिल गोटे (Former MLA. Anil Gote) यांनी सांगितले.

- Advertisement -

शहरातील राष्ट्रवादी भवनात आज पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. पक्षाध्यक्ष शरद पवार हे दि.30 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस भवन नूतनीकरण कार्यालयाच्या उद्घाटनासाठी धुळ्यात येत आहेत. यासंदर्भात नियोजन करण्याबाबत आजही बैठक झाली. बैठकीत पोपटराव सोनवणे, ए.बी.पाटील, रमेश करंकाळ, नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे, डॉ मनोज महाजन, प्रशांत भदाने, विजय वाघ, सलीम शेख, जमीर शेख, सरोज कदम, नगरसेवक अहमद लतिफ अन्सारी, उमेर अन्सारी, मुक्तार मन्सुरी, वसीम मंत्री यांनी मनोगत मांडले.

प्रत्येकवेळी शहरात नेतेमंडळी येतात मात्र आजपर्यंत महिलांना भेटीगाठी संदर्भात व आपले मत व्यक्त करण्यासंबंधी दुजाभाव केला जात होता. परंतु श्री. गोटे यांच्या माध्यमातून पहिल्यांदा आम्हाला आमच्या पक्षप्रमुखांशी बोलण्याची, भेटण्याची संधी प्राप्त होणार आहे, असे सरोज कदम यांनी सांगितले.

बैठकीत श्री.गोटे म्हणाले, प्रत्येक तालुक्यातील किमान 25 कार्यकर्त्यांची ओळख पक्षप्रमुख शरद पवार याच्यांशी करून देण्याची संधी उपलब्ध होणार आहेत. सध्या स्थानिक पातळीवर पक्षांमध्ये वरील व्यक्ती आणि खालील व्यक्ती यांच्यातील दलालीचे काम काही नेतेमंडळी करीत आहेत. सर्व चुकीच्या गोष्टी मला मोडून काढायच्या आहे आणि काढणारच आहे. कार्यालयाच्या नूतनीकरणाच्या कार्यक्रमांचे निमंत्रण द्यावयाचे असताना आपण स्वतः अजित पवार यांना फोन केला होता.

मी त्यांना म्हणालो, निमंत्रण देण्यासाठी स्थानिक कार्यकर्ते, नेते येणार आहेत मग ते म्हणाले तुम्ही पण यावे. मात्र आपण स्पष्ट नकार दिला. कारण आपल्या तळागाळातील कार्यकर्त्यांना आपला नेता कधी कळेल व कार्यकर्ते हे आपल्या वरिष्ठ नेत्यांना कधी कळतील. नेता व कार्यकर्त्यांना नेते कळले पाहिजे याचे कारण असे की, या कार्यालयासाठी जे स्वतः कष्ट करीत होते व आपल्या माध्यमातून आर्थिक व श्रमदान अशा वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी पक्षाच्या कार्यालयासाठी काम केले त्यांचा सन्मान नको का व्हायला! असेही श्री.गोटे म्हणाले. पक्षाने काय दिले यापेक्षा आपण पक्षाला काय देतो हेही महत्वाचे आहे. मुळात पक्षाने आपल्याला ओळख दिली हेच अती महत्वाचे असल्याचेही ते म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या