Wednesday, April 24, 2024
Homeनगरनगर : दुकान फोडून लाखाचा ऐवज लंपास

नगर : दुकान फोडून लाखाचा ऐवज लंपास

अहमदनगर|प्रतिनिधी| Ahmednagar

सावेडीमधील कार सजावट दुकानावर चोरट्यांनी डल्ला मारून 51 हजार रूपयांची रोख रक्कम व इतर साहित्य असा एक लाख पाच हजार 350 रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

तेजस हरीदास जगताप (वय- 24 रा. भिस्तबाग चौक, सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे पद्मावती पेट्रोलपंपाशेजारी सत्यम कॉम्प्लेक्समध्ये बी. जे कार सजावट नावचे दुकान आहे. त्यांनी रात्री साडेआठ वाजता दुकान बंद केले. यानंतर अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचे शटर उचकाटून आत प्रवेश केला. दुकानातील 51 हजार 850 रूपयांची रोख रक्कम चोरली. यानंतर चोरट्यांनी दुकानाची उचकापाचक करून कार सजावटीचे साहित्य चोरून नेले. एकुण एक लाख पाच हजार 350 रूपयांचा मुद्देमाल चोरील गेला असल्याचे जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सदाशिव कणसे करीत आहे. दरम्यान शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी घटनास्थळी भेट दिली असून तपासाबाबत सुचना केल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या