Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकसिन्नर औद्योगिक वसाहतीला उज्वल भविष्य- जिल्हाधिकारी गंगाथरन डी.

सिन्नर औद्योगिक वसाहतीला उज्वल भविष्य- जिल्हाधिकारी गंगाथरन डी.

नाशिक | प्रतिनिधी Nashik

सिन्नर औद्योगिक वसाहतीला उज्वल भविष्य असल्याचे जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी निमा सिन्नर कार्यालयास निमा पदाधिकारी व उद्योजकांच्या भेटी प्रसंगी सांगितले.

- Advertisement -

यावेळी निमाचे उपाध्यक्ष किशोर राठी, उपाध्यक्ष आशिष नहार, सुरेंद्र मिश्रा, सिन्नर डेव्हलपमेंट उपसमितीचे अध्यक्ष किरण वाजे, महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी राजेंद्र राजपूत, अमर दुरगुळे, संजय रेदासणी, बबन वाजे, राहुल नवले, किरण लोणे आदी उपस्थित होते.

सिन्नर औद्योगिक वसाहत औद्योगिक विकासाच्या दृष्टीने देश पातळीवर नावाजलेले असून भविष्यात अनेक मोठे उद्योग सिन्नर औद्योगिक क्षेत्रात येण्याची शक्यता आहे व त्यानुसार मोठे औद्योगिक क्षेत्रफळ सुद्धा सिन्नरमध्ये असल्याचे त्यांनी निमाच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले.

सिन्नर औद्योगीक वसाहतीत असलेल्या पायाभूत समस्या निमाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निदर्शनास आणून दिल्या.

त्यात सीईटीपी विकसित करणे, डी झोन दर्जा देणे, माळेगांव व मुसळगाव औद्योगिक वसाहती ला जोडणारा लिंक रोड तयर करणे, उद्योजकांना नवीन व्यवसायाच्या संधी निर्माण होण्याच्या दृष्टीने मोठे उद्योग आणणे असे अनेक प्रश्न उद्योजकांनी मांडले.

त्यास जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पायाभूत समस्यांचे निरसन करण्याचे व लवकरच सिन्नर औद्योगिक वसाहतीत उद्योजकांच्या पायाभूत समस्या व औद्योगिक विकासाच्या दृष्टीने स्वतंत्र बैठक घेण्याचे आश्वासन दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या