Friday, April 26, 2024
Homeधुळेअधीक्षक कार्यालयात पोलिसाकडूनच घेतली लाच

अधीक्षक कार्यालयात पोलिसाकडूनच घेतली लाच

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

शहरातील जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील कनिष्ठ लिपिकास पाच हजार रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. आज सकाळी पोलिस अधिक्षका कार्यालयाजवळच ही सापळा कारवाई करण्यात आली.

- Advertisement -

सोनगीर येथील तक्रारदार पोलीस कर्मचारी यांचे निलंबन काळातील पुरवणी बिल 13 लाख 72 हजार 623 रूपये मंजुर करून दिल्याच्या प्रक्रियेत सहाय्य करण्याच्या मोबदल्याने पोलिस अधिक्षक कार्यालयातील कनिष्ठ लिपिक चंद्रकांत तुकाराम महाले (वय 36) यांनी पाच हजार रुपयाची लाचेची मागणी केली होती.

याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार दाखल केली. त्यानुसार आज पथकाने पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळ सापळा रचून कनिष्ठ लिपिक चंद्रकांत महाले यास तक्रारदाराकडून पाच हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले.

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सुनील कुराडे यांच्यासह पथकातील संतोष हिरे, संदीप सरग, कृष्णकांत वाडीले, प्रशांत चौधरी, भुषण खलाणेकर यांनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या