Friday, April 26, 2024
Homeनगरलाच मागणार्‍या हवालदाराला अटक

लाच मागणार्‍या हवालदाराला अटक

अहमदनगर |प्रतिनिधी|Ahmednagar

लाच मागणी प्रकरणी दाखल गुन्ह्यात शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पोलीस हवालदार संजय जनार्धन बडे (वय 52 रा. वामननगर, पाथर्डी) याला येथील लाचलुचपत विभागाने गुरूवारी अटक केली. त्याला न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.

- Advertisement -

तक्रारदार व त्याचा व्यवसायातील भागीदार यांचे विरूध्द मुरूम चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी व मुरूम उत्खननासाठी वापरलेले जेसीबी मशीन जप्त न करण्यासाठी हवालदार बडे याने तक्रारदार यांचेकडे 50 हजार रूपयांची मागणी करून तडजोडअंती 40 हजार रूपये स्विकारण्याचे मान्य केल्याचे 13 जुलै, 2022 रोजी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकाने केलेल्या लाच मागणी पडताळणीमध्ये निष्पन्न झाले होते.

त्यावरून बडे विरूध्द 3 ऑगस्ट रोजी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून बडे पसार होता. गुरूवारी त्याला अटक केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास उपअधीक्षक हरीष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद गोर्डे हे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या