सुष्मिता सेन आणि रोहमन शॉलचे ब्रेकअप; पण…

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री सुष्मिता सेनने (Sushmita Sen) तिचा बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबत (Rohman Shawl) ब्रेकअप (Breakup) झाल्याची पुष्टी केली आहे. इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीने ब्रेकअपनंतर पोस्ट शेअर केली.

रात्री उशिरा सुष्मिताने एक नवीन पोस्ट लिहिली. त्यात तिने स्वतःचा एक फोटोही शेअर केला आहे. सुष्मिताने रोहमनसोबतचा एक फोटो शेअर करत लिहिले, आम्ही मित्र म्हणून सुरुवात केली आणि आम्ही मित्रच राहिलो. नातं खूप जुनं होतं…प्रेम कायम राहील. यासोबत सुष्मिताने नो मोअर स्पेक्युलेशन, जगा आणि जगू द्या असा हॅशटॅग लिहिला.

या वर्षी फेब्रुवारीमध्ये सुष्मिता सेनने एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये तिने बिघडलेल्या नात्यातून बाहेर पडण्याबद्दल लिहिले होते. यानंतर चाहत्यांनी अंदाज लावला की तिचा रोहमन शॉलसोबत ब्रेकअप झाला आहे का? मात्र, या जोडप्याने सार्वजनिक स्वरूप देऊन या अफवेला पूर्णविराम दिला.

सुष्मिता सेन आणि तिचा बॉयफ्रेंड रोहमन शॉल बराच काळ एकमेकांसोबत राहात होते. दोघेही खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. शॉपिंग असो, इव्हेंट्स असो किंवा व्हेकेशन, दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. दोघांचं प्रेम पाहून चाहते खूप खुश होत असत.

दोघांच्या लग्नाबाबत अनेक अफवा पसरल्या होत्या. परंतु आता जी बातमी समोर येत आहे ती दोघांच्या चाहत्यांसाठी धक्क्यापेक्षा कमी नाही. या दोघांचं ब्रेकअप (Sushmita-Rohman Breakup) झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. दोघांचं नातं संपुष्टात आल्यानंतर रोहमन शॉलनं अभिनेत्रीचं घर सोडलं असल्याचं म्हटलं जात आहे.