Saturday, April 27, 2024
Homeजळगावजळगाव : संचारबंदीचे उल्लंघन ; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव : संचारबंदीचे उल्लंघन ; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव | प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरात संचारबंदी असतानाही विनाकारण फिरणार्‍या सात जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर देशभरात २१ दिवसांचे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले असून यानिमित्त शहरात संचारबंदी सुरू आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना रस्त्यावर येण्यास बंदी आहे. परंतु, एमआयडीसी हद्दीत सात जणांना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आले.

- Advertisement -

त्यांच्याविरुद्ध संचारबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. यात आरोपी मयूर दगडू सोनवणे (वय २१), बाळू सीताराम धनगर (वय ५२, रा. सुप्रिम कॉलनी), दगडू पंढरीनाथ घुगे (वय ५०, रा. जोशीवाडा, मेहरुण), प्रमोद सुपडू घुगे (वय ४७, रा. सुप्रिम कॉलनी), जितेंद्र अण्णा टिळंगे (वय २४, रा. जाखनी नगर, कंजरवाडा), उमेश पंढरीनाथ अहिरे (वय २१, रा.पंचमुखी हुनमान मंदिराजवळ, लाठी शाळेजवळ), ईश्वर बहारूमल मेथनी (वय ५४, रा. कंवरनगर, सिंधी कॉलनी) यांच्याविरुद्ध पोलीस हेड कॉन्स्टेबल मुद्दस्सर काझी यांच्या फियादीवरुन सात जणांविरुद्ध जमावबंदी आणि आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपास सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील करीत आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक रणजित शिरसाठ, पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, रामकृष्ण पाटील, नाईक नितीन पाटील, कॉन्स्टेबल प्रवीण मांडोळे, सचिन पाटील, योगेश बारी, हेमंत कळसकर, असिम तडवी, मुदस्स काझी, इम्रान अली सय्यद, लुकमान तडवी यांनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या