Saturday, April 27, 2024
Homeजळगावअमळनेर : एमडी डॉक्टरांची सर्दी ताप खोकला तपासणी सेवा सुरू ; प्रशासनाला...

अमळनेर : एमडी डॉक्टरांची सर्दी ताप खोकला तपासणी सेवा सुरू ; प्रशासनाला मदत, आमदारांचे प्रयत्न सफल

अमळनेर – प्रतिनिधी
शहरातील शासकीय डॉक्टरांना मदत म्हणून सर्व एम.डी.खाजगी डॉक्टरांनी कोरोना सदृष्य सर्दी ताप खोकला असलेल्या रूग्णांची मोफत तपासणी करिता आपली सेवा समर्पीत केली आहे. आ.अनिल पाटील यांनी शहरातील सर्व एमडी डॉक्टर्स यांना विनंती केल्यावरून त्यांनी सेवा समर्पित केली.

दि.२७ पासून सर्दी ताप खोकला तपासणी सेवा सुरू करण्यात येत असून शहरातील सर्व एमडी डॉक्टर्स व आयएमए संघटनेचे सदस्य प्रशासनाला मदत करणार आहेत. त्यात सर्दी, ताप, खोकला, असणाऱ्या पेशंटची तपासणी करण्यात येणार आहेत. व गोळ्या औषधे लिहून देणार आहेत.

- Advertisement -

आ.अनिल पाटील यांनी घेतलेल्या पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली याठिकाणी प्रांताधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार मिलिंद वाघ, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप वायाळ, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ गिरीश गोसावी, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रकाश ताडे, नगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ विलास महाजन, डॉ अविनाश जोशी, डॉ संदीप जोशी, डॉ.निखिल बहुगुणे, डॉ किरण बडगुजर, प्रशांत शिंदे, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे उपस्थित होते.

शहरातील सर्व खाजगी डॉक्टर्सकडे येणाऱ्या सर्व रुग्णांना या ठिकाणी पाठवण्याची सूचना करण्यात येणार असुन त्या सर्वांची नोंद घेतली जाणार आहे. त्यामुळे त्यांनी अशा लक्षणांची रुग्ण इंदिरा गांधी शाळेत होणार आहे. याठिकाणी इतर तपासण्या होणार नाहीत त्या रुग्णांनी येऊ नये.

सर्दी खोकला ताप अशा लक्षणे आढळलेल्या सर्व रुग्णांना याठिकाणी एकत्रित करण्यात येणार असून अशा रुग्णांची तपासणी इंदिरा गांधी शाळेत सकाळी १० ते १ तपासणी होणार आहे. विनाकारण तपासायला येणार्यांना प्रवेश दिला जाणार नाही याठिकाणी प्रांताधिकारी सीमा अहिरे या सर्व विखुरलेले पेन्शट एकत्र करून त्यांच्या तपासण्या करून घेणार आहेत.

येथील डॉक्टर्स शासनाला मदत म्हणून आमदार अनिल पाटील यांच्या आग्रहाने एक विनामूल्य सेवा करण्यासाठी तयार झाले आहेत. शहरात व तालुक्यात शासकीय आरोग्य सेवेकडून एव्हडे आव्हान स्वीकारले जाणार नाही म्हणून त्यांनी स्थानिक जनतेच्या सेवेकरिता व जास्त कोरोना पसरू नये यासाठी ही उपाययोजना सुरू केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या