चाळीसगावच्या उंबरठ्यावर करोना ; नागरिकांंकडून सोशल डिस्टन्सची अपेक्षा

jalgaon-digital
3 Min Read

मालेगावमुळे चाळीसगावात धोका, नागरिकांंकडून अजूनही सोशल डिस्टन्स नाहीच, कडक कारवाईची अपेक्षा

चाळीसगावात नियांमाचे उल्लघन करणार्‍यावर दररोज कारवाई करण्यात येत आहे. परंतू यापुढे तोंडाला मास्क न लावले, विनाकारणा घराबाहेर पडणार्‍यावर कडक कारवाई केली जाईल. नागरिकांनी शासनाच्या नियामांचे पालन करावे. स्वता; व इतरांच्या सुरक्षितेसाठी घरातच थांबावे.
विजयकुमार ठाकुरवाड, पो.निरिक्षक, चाळीसगाव

चाळीसगाव । प्रतिनिधी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे. परंतू तरी देखील कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, चाळीसगावपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मालेगावमध्ये तर कोरोनाने अक्षरशा कहर केला. तब्बल 36 रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने भयकंप निर्माण झाले आहे. पाठोपाठ पाचोर्‍यातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे.

तर जवळच असलेल्या धुळे जिल्ह्यातही कोरोनाचे रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. चाळीसगाव शहर या सर्वा अगदी तासाभराच्या अंतरावर असल्यामुळे चाळीसगावच्या उंबरठ्यावर कोरोना येवून पोहचला आहे. त्यामुळे चाळीसगावकरांच्या मनात प्रचंड भिती निर्माण झाली आहे. परंतू चाळीसगावात सोशल डिस्टनचा पूर्णता; फज्जा उडालेला आहे.

तालु्क्याच्या चारही बाजुंनी सीमा बंद करण्यात आल्या असल्या तरी बाहेरगावाहून येणारे लोंढे कायम आहेत. त्यामुळे प्रशासनाने वेळीच सजग होत कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने अत्यावश्यक सेवा वगळता सर्वत्र लॉकडाऊन जाहीर केलेला आहे.

मात्र अत्यावश्यक सेवांच्या नावाखाली अनेक नागरीक घराबाहेर पडत असून शहरात पुन्हा गर्दी होण्यास सुरवात झाली आहे. भाजीपाला, किराणा दुकाने, बँकांसमोर नागरीकांची होणारी गर्दी पाहता सोशल डिस्टन्सचा पुरता बोर्‍या उडाला आहे.

अत्यावश्यक सेवांच्या नावाखाली नागरीक वारंवार बाहेर पडत आहेत. मालेगाव व धुळ्यानंतर सर्वात मोठी धक्का देणारी बातमी म्हणजे पाचोर्‍यातही कोरोना बाधित रूग्ण मिळून आला आहे. त्यामुळे पाचोर्‍यातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. पाचोरा चाळीसगावपासून जवळ आहे. मालेगाव, धुळे आणि आता पाचोरा चोही बाजुने चाळीसगाव तालुक्याला कोरोनाचा विळखा बसला आहे.

हा कोरोना चाळीसगावच्या दाराशी येवून पोहचला आहे. कधी तो घाव घालेल याचा भरोसा नाही. त्यामुळे तालुका प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी वेळीच दखल घेत कोरोनाला रोखण्यासाठी सक्तीची जनता कर्फ्यु लावण्याची गरज आहे. संचारबंदीत गर्दी होवू नये म्हणून पोलीसांकडून कारवाई होत आहे.

आतापर्यत 500 पेक्षा अधिक जणांवर कारवाई करण्यात आली आहे. मालेगावमध्ये एकाच दिवशी तब्बल 36 पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आल्याने प्रशासन चांगलेच हादरले असून मालेगावमधून बाहेर पडण्याच्या सर्व वाटा बंद करण्यात आल्या आहेत. करोना प्रसाराचा हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावमधील नागरिक स्थलांतरीत होत असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहे.

मालेगाव शहरातून बाहेर जाणार्‍या धुळे, मनमाड, येवला तसेच चाळीसगाव चौफुली अशा विविध मार्गांवर सतर्क चेकपोस्ट तैनात आहे.तसेच शहरातील अनेक रस्ते बॅरकेडिंग करून अथवा रस्ते खोदून वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर मालेगावकडून येणार्‍या मार्गावर दक्षता बाळगण्याची गरज आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *