Wednesday, April 24, 2024
Homeजळगावचाळीसगाव : करोना पॉझिटिव्ह संपर्कातील बारा जण ताब्यात ; जळगाव येथे तपासणीसाठी...

चाळीसगाव : करोना पॉझिटिव्ह संपर्कातील बारा जण ताब्यात ; जळगाव येथे तपासणीसाठी रवाना

गरोदर महिलेने केला शिरूड ते चाळीसगाव प्रवास
पोलिसांच्या कार्यपद्धतीवर संशय

चाळीसगाव । प्रतिनिधी

- Advertisement -

धुळे जिल्ह्यातील शिरुड येथे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. त्याच्या संपर्कात आल्याच्या संशयावरून, चाळीसगाव येथील माहेर असलेल्या महिलेसह चार जण व मेहुणबारे येथील तीन जण असे एकूण बारा जणांना शनिवारी पोलिसांनी खबरदारीसाठी ताब्यात घेतले, त्यांना पुढील तपासणीसाठी तातडीने जळगाव येथे रवाना करण्यात येणार असल्याची माहिती डॉ.बी.पी. बाविस्कर यांनी दिली आहे.

धुळे जिल्ह्यातील शिरूड येथे एक करोना पॉझिटिव्ह मिळाल्याने, त्यांच्या शेजारी राहणारा व्यक्तीची सासरवाडी चाळीसगाव येथील आहे, त्या दोघांची मैत्री असल्याने हे दोघे एकाच गाडीत ये-जा करीत होते. दरम्यान चाळीसगाव येथे माहेर असलेल्या मित्राची पत्नी गरोदर असल्याने ती नुकतीच चाळीसगाव येथे आली.

याची माहिती चाळीसगाव तहसीलदारांना, शिरुड येथील तहसीलदारांनी दिली. त्यामुळे चाळीसगाव येथे माहेर असलेल्या त्याच्या पत्नीच्या संपर्कातील परिवारातील चाळीसगाव येथील सदस्य तसेच मेहुणबारे येथील सदस्यांना पोलिसांनी कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याच्या संशयावरून खबरदारीसाठी शनिवारी ताब्यात घेतले.

यात मेहुणबारे येथील पती-पत्नी व मुलगी तर चाळीसगाव येथे चार महिला, दोन मुले, तीन पुरुषांना अशा बारा लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची चाळीसगाव येथील ग्रामीण रुग्णालयात डॉ. बाविस्कर तपासणी केली असून पुढील तपासणीसाठी जळगाव येथे तात्काळ रवाना करण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

दरम्यान कोरोना पॉझिटिव्हच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील महिला चाळीसगावात शिरूड येथून आलीच कशी हा प्रश्न उपस्थित केला जात असून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर शंका व्यक्त केली जात आहे. दरम्यान या घटनेमुळे चाळीसगावात एकच खळबळ उडाली असून विविध चर्चांना ऊत आला आहे. तरी नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाचे नियमाचे पालन करावे असे आव्हान प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या