Thursday, April 25, 2024
Homeजळगावचाळीसगाव येथे धाडसी चोरी

चाळीसगाव येथे धाडसी चोरी

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

शहरातील पाटीलवाडा परिसरातील एकाच्या बंद घराचा घराचा कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील कपाटात ठेवलेल्या जवळपास १० ते ११ तोळे सोन्या-चांदीच्या दागीण्यांची चोरी झाल्याची चर्चा आहे, या सोन्याची किंमत पाच ते साडेपाच लाख रुपये असल्याचे समजते आहे. हि घटना आज दुपारी उघडकीस आली असून घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली आहे.

- Advertisement -

याबाबत माहिती अशी की, पाटीलवाडा भागातील रिंगरोडवरील रहिवाशी सखाराम परभत राजपूत हे पुणे येथे मुलांकडे वास्तव्यास असतांना, याच दरम्यान त्यांचे बंद घरावर पाळत ठेवून अज्ञात चोरट्याने काल रात्री त्यांच्या तळमजल्यावरील घराचा कडीकोयंडा आणि कुलूप तोडून कपाटात ठेवलेले सोन्याची मंगळ पोत, बांगड्या, नेकलेस, कानातील झुंबर यासह चांदीचे कडे, साखळ्या असा जवळपास १० ते ११ तोळे किंमत अंदाजे पाच ते साडेपाच लाख कपाटातून चोरुन नेला. आज सकाळी ११ वाजता घडलेला प्रकार त्यांच्या भावंडांना लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती पोलीसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पहाणी केली. घर मालकांना देखील या प्रकाराची माहिती देण्यात आल्यानंतर ते पुणे येथून रात्री उशिरापर्यंन्त येण्याची शक्यता असून त्यानंतरच या चोरीतील मुद्देमालाचा अधिक तपशील समजणार असून गुन्हां दाखल होणार असल्याची समजते आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या