Thursday, April 25, 2024
Homeनगरसमुद्राला वाहून जाणारे पाणी पश्चिम वाहिनी नद्यांमध्ये सोडा

समुद्राला वाहून जाणारे पाणी पश्चिम वाहिनी नद्यांमध्ये सोडा

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

सह्याद्री घाटमाथ्यावरील पावसाचे समुद्राला वाहून जाणारे पाणी पश्चिम वाहिनी नद्यांमध्ये सोडून महाराष्ट्र दुष्काळ मुक्त करा,

- Advertisement -

अशी मागणी भ्रष्टाचार काळापैसा विरोधी भारतीय जनसंसदने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेकडे केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले की, सह्याद्रीचे घाटमाथ्यावरील समुद्राला वाहून जाणारे पाणी अडवून बोगद्याव्दारे पश्चिम वाहिनी नद्यांमधून दुष्काळी भागात सोडून महाराष्ट्र दुष्काळमुक्त करावा. या मागणीच्या पाठपुराव्यासाठी आम्ही दि.27 जून 2018 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविले.

केंद्र सरकारच्या जल संसाधन, नदी विकास व गंगा संरक्षण मंत्रालयालाही पत्र लिहिले. तत्कालीन केंद्रीय जलसंधारण मंत्री नितीन गडकरी यांनी दि.25 ऑक्टोबर 2018 रोजी नाशिक येथील सभेत ठाण्याजवळ धरण बांधण्यासाठी 30 हजार कोटींची घोषणा केली होती.

पद्मभूषण कै.बाळासाहेब विखे पाटील हे खासदार असताना त्यांनी सलग 25/30 वर्षे वरील धरणाच्या पाण्याचा सर्वे करून फाईल तयार केली होती. ती फाईल तसीच धूळखात पडलेली आहे.

माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनीही मंत्री गडकरी यांचेकडे हाच पाणी प्रश्नाचा मुद्दा मांडला.त्यांनी त्याला संमती दिली होती.ं असे अनेक वर्षांपासून प्रयत्न झाले. मोदी सरकारच्या काळातच या प्रश्नाला यश येईल असे वाटते. केंद्र सरकार तो प्रकल्प करील अशी जनतेला अपेक्षा आहे.

याच प्रश्नासाठी आम्ही दि.28 नोव्हेंबर 2018 ला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला नोटीस देऊन मंत्रालयात किंवा वर्षा बंगल्यासमोर आमरण उपोषणास बसू असे कळविले होते. त्याप्रमाणे रामराव पाटील भदगले, डॉ.अशोकराव ढगे, अ‍ॅड. विठ्ठलराव जंगले असे आम्ही मुंबईला गेलो असता 144 कलम असल्याने तत्कालीन आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी मध्यस्थी करून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा करण्यासाठी अर्धातास वेळ दिला.

त्यांनी तत्कालीन विधानसभा सदस्य बाळासाहेब मुरकुटे, शिवाजीराव कर्डिले, भाऊसाहेब कांबळे यांच्या साक्षीने हा प्रश्न आम्ही सोडवू, असे आम्हास आश्वासन दिले. शेतकरी सुखी पहावा वाटत असेल तर समुद्राला वाहून जाणारे पाणी पश्चिम वाहिनी नद्यांमध्ये सोडून महाराष्ट्र दुष्काळमुक्त करावा. निवेदनावर भ्रष्टाचार काळापैसा विरोधी भारतीय जनसंसदचे नेवासा तालुका अध्यक्ष रामराव भदगले, अ‍ॅड. विठ्ठलराव जंगले, एस.आर.शिंदे, मारुती भोगे, राजेंद्र पोतदार आदींच्या सह्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या