Saturday, April 27, 2024
Homeदेश विदेशश्रद्धा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती, प्रेयसीच्या मृतदेहाचे तुकडे...

श्रद्धा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती, प्रेयसीच्या मृतदेहाचे तुकडे…

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

हैदराबादमध्ये (Hyderabad) दिल्लीतील श्रद्धा वालकर (shraddha walker) हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती झाली आहे. एका व्यक्तीने आपल्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या (Murder) करून तिच्या मृतदेहाचे तुकडे दगड कापण्याच्या मशीनने केले आहेत. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी फेकल्याची घटना उघडकीस आली आहे….

- Advertisement -

एका खून प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांच्या तपासात हा धक्कादायक खुलासा झाला आहे. संशयिताने मृताचे पाय आणि हात त्याच्या घराच्या रेफ्रिजरेटरमध्ये ठेवले होते आणि दुर्गंधी येऊ नये म्हणून जंतूनाशक आणि परफ्यूम फवारले होते.

गौतमीचं आडनाव पाटील नव्हे तर…; पुन्हा नव्या वादाला फुटलं तोंड

हैदराबाद पोलिसांना 17 मे रोजी शहरातील मुसी नदीजवळ एका खुनाची माहिती मिळाली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता 48 वर्षीय आरोपी चंद्र मोहनचे 55 वर्षीय कृतिका याराम अनुराधा रेड्डीसोबत गेल्या 15 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. पतीपासून विभक्त झालेली ही महिला चंद्र मोहनसोबत त्याच्या चैतन्यपुरी कॉलनी, दिलसुखनगर येथील घरी राहत होती.

कृतिका 2018 पासून व्याजावर पैसे देण्याचा व्यवसाय करत होती. संशयिताने मयताकडून ऑनलाइन व्यवसाय करण्यासाठी सात लाख रुपये घेतले होते आणि या पैशावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला.

महिलेने पैशासाठी दबाव टाकल्याने तिचा राग मनात धरून तिची हत्या करण्याचा कट रचण्यात आला. 12 मे रोजी आरोपीने घरी भांडण करून तिच्यावर चाकूने हल्ला केला, तिच्या छातीवर आणि पोटावर वार केले यात तिचा मृत्यू झाला.

टाटा समूहाचा जगभरात डंका; टॉप 20 कंपन्यांमध्ये समावेश

हत्या केल्यानंतर आरोपीने मृतदेहाचे तुकडे करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी दोन लहान दगड कापण्याची मशीन खरेदी केली. धडापासून डोके कापून काळ्या पॉलिथिनच्या आवरणात ठेवले. त्यानंतर तिचे पाय आणि हात वेगळे करून फ्रीजमध्ये ठेवले.

१५ मे रोजी संशयिताने मृताचे शीर एका रिक्षातून मुशी नदीजवळ आणून तेथे फेकले. संशयित फिनाइल, डेटॉल, अत्तर अगरबत्ती आणि कापूर आणून केलेल्या अवयवांच्या तुकड्यांवर नियमितपणे शिंपडत होता जेणेकरून आजूबाजूच्या परिसरात दुर्गंधी पसरू नये. ऑनलाइन व्हिडिओ पाहून शरीराच्या अवयवांची विल्हेवाट लावण्याच्या पद्धती त्यांनी पाहिल्या.

तो मृत महिलेच्या मोबाईलवरून तिच्या ओळखीच्या लोकांना मेसेज पाठवत होता. मात्र १७ मे रोजी मुशी नदीजवळील अफझलनगर कम्युनिटी हॉलसमोरील कचराकुंडीत सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मुंडके सापडले.

राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल; म्हणाले, गद्दारांच्या…

यानंतर पोलिसांनी या गुन्ह्याची नोंद करून तपासासाठी आठ पथके तयार केली. सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तपासानंतर पोलिसांना संशयिताची ओळख पटली. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी मृत महिलेचे बाकीचे शरीराचे तुकडे संशयिताच्या घरातून जप्त केले आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या