Thursday, May 2, 2024
Homeजळगावखेडी येथे सर्पदंशाने 12 वर्षीय मुलाचा मृत्यू

खेडी येथे सर्पदंशाने 12 वर्षीय मुलाचा मृत्यू

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

तालुक्यातील खेडी शिवारातील माऊली नगरात आई, वडील व बहिण यांच्यासोबत घरात मोबाईलमध्ये चित्रपट बघत असताना विषारी सापाने दंश केल्याने रोहीत गुड्डू चव्हाण (वय 12) या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री 12.30 वाजता खेडी शिवारातील माऊली नगरात घडली.

- Advertisement -

याप्रकरणी आज सोमवारी सकाळी 11 वाजता एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मूळ चोपडा तालुक्यातील रहिवासी असलेले गुड्डू चव्हाण हा बांधकाम व्यावसायिक रमेश चंद्रकांत वानखेडे यांच्याकडे वाचमन म्हणून कामाला आहे.

वानखेडे यांची खेडी शिवारातील माऊली नगरात बांधकामाची साईड सुरु आहे. तेथेच गुड्डू चव्हाण हा पत्नी संगीता, मुलगा रोहीत व एक मुलगी या कुटुंबासह वास्तव्याला होते. काल रविवारी रात्री जेवण झाल्यानंतर सर्व जण मोबाईलमध्ये घरात चित्रपट बघत होते.

त्यावेळी रोहीत याला काही तरी चावा घेतल्यासारखे जाणवले. त्यानंतर काही क्षणातच त्याची प्रकृती बिघडली. आपल्याला काही तरी चावल्याचे त्याने आई, वडीलांना सांगितले.यावेळी त्यांनी त्याला पाणी पाजले. त्याची अवस्था पाहून गुड्डू चव्हाण यांनी वानखेडे यांना कळविले.

त्यांनी त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात आणले. तेथे 12.30 वाजता वैद्यकिय अधिकारी डॉ.अजय सोनवणे यांनी त्यास मृत घोषीत केले. सर्पदंश झाल्याने रोहीतचा मृत्यू झाल्याने डॉक्टरांनी स्पष्ट केले.

डॉ. सोनवणे यांच्या खबरीवरुन एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या