Wednesday, April 24, 2024
Homeजळगावराष्ट्रवादीच्या अनिल पाटलांच्या हाती धनुष्यबाण ?

राष्ट्रवादीच्या अनिल पाटलांच्या हाती धनुष्यबाण ?

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जळगावातील जलचा अर्थ हा जलनेवाला असून दुसरा अर्थ पाणीवाला असा आहे. भोकर (Bhokar) येथील तापीनदीच्या (Tapinadi Bridge) पुलासाठी तब्बल 9 बैठका घेतल्या होत्या. परंतु अपने प्यार का वादा फिप्टी-फिप्टी असे म्हणत गिरीशभाऊ तुम्ही आम्हाला सोडून दिले. मात्र आम्ही देखील तारीख पे तारीख घेवून पाठपुरावा सुरू ठेऊन पुलाच्या कामाचे भूमिपूजन (Bhoomipujan)मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करून घेतल्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी सांगितले. खेडी-भोकर या पुलाच्या कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील (Guardian Minister Gulabrao Patil)यांनी आपल्या भाषणातून चौफेर फटकेबाजी केली.

- Advertisement -

केळीचा पोषण आहारात समावेश करा

उद्योग व बंदरे मंत्री उदय सामंत यांच्याकडून ऊसाला, आंब्याला पैसे दिले जातात. परंतु केळीला पैसे देत नाही. मात्र आज जोपर्यंत त्यांच्याकडून घोषणा केली जात नाही, तो पर्यंत त्यांना याठिकाणाहून जावू देणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. शाळेत विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्‍या पोषण आहारात केळीचा समावेश करण्यासाठी मागणी विधासभेत मांडली होती. त्यामुळे केळीचा भाव संतुलीत राहण्यास मदत होणार असल्याची मागणी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी उदय सामंत यांच्याकडे केली. त्याप्रमाणे कापसासाठी आंतरराष्ट्रीय भावाचा चढउतार आहे. शासनाने त्याकडे देखील लक्ष द्यावे असे पाटील यावेळी म्हणाले.

गिरीशभाऊ तुम्हीही दाढी वाढवा

केंद्रात दाढीवाले आहे राज्यात देखील दाढीवाले परंतु गिरीश भाऊ आम्ही तुमच्या सारखे सुंदर तर नाही मात्र तुम्हालाही आता दाढी वाढवावी लागेल असा मिश्किल टोला ना. पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन यांना लगावला.

माझा नंबर 33 वा तुमचा किती?

शिवसेनेत बंडखोरी झाल्यापासून आम्हाला गद्दार म्हटले जात आहे. परंतु नागपूर पासून ते मुंबई पर्यंत मी एकटाच शिल्लक असल्याचे वाटल्यानंतर मी देखील शिंदे गटात गेलो. त्यावेळी माझा क्रमांक 33 वा होता पण दादासाहेब आपण तर मुख्यमंत्र्यांसोबत होता त्यामुळे आपण किती नंबरवर होतात असे म्हणत ना. पाटील यांनी मंत्री दादाजी भुसे यांची देखील कोपरखळी काढली.

राष्ट्रवादीच्या अनिल पाटलांच्या हाती धनुष्यबाण ?

भोकर पुलामुळे अमळनेरचा मार्ग सुकर होणार असल्याने या पुलाच्या भूमीपुजनाच्या कार्यक्रमाला अमळनेरचे राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी देखील व्यासपीठावर हजेरी लावली होती. दरम्यान, यावेळी सत्कार समारंभ सुरु असतांना राष्ट्रवादीच्या आमदारांच्या हातात उपस्थितांनी धनुष्यबाण दिला होता. हा धनुष्यबाण ताणत तो त्यांनी लागलीच खाली ठेऊन दिला. दरम्यान राष्ट्रवादीच्या आमदाराच्या हाती धनुष्यबाण आल्याची चर्चा रंगली होती. मात्र हा धनुष्यबाण आघाडीचा असल्याचा खुलासाही आमदार अनिल पाटील यांनी केला.

पाडळसरेवर अनेकांनी राजकारण केले

आदिवासी टोकरे कोळी यांना अनुसुचित जातीचे प्रमाणपत्र नसल्यामुळे त्यांना नोकरीवरुन काढले जात आहे. त्यामुळे या प्रश्न देखील मुख्यमंत्र्यांनी मार्गी लावावा. ज्याप्रमाणे या पुलासाठी निधी दिला त्याप्रमाणे निम्न तापी प्रकल्पाला निधी दिल्यास आमचा शेतकरी भुकेला राहणार नाही. या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील पाच तालुक्यांचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटेल. पाडळसरे धरणावर अनेकांनी आत्तापर्यंत राजकारण केल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच जलजीवन मिशन अंतर्गत राज्यात 38 हजार गावांमध्ये कामे सुरु असून त्यातून नागरिकांचा स्वच्छ पाणी दिल जात आहे. त्यामुळेच मला पुन्हा पाणीपुरवठा खात्याचा मंत्री केले आहे. जलजीवन मिशन आल असून त्यासाठी हा पाणीवाला बाबा गुलाबराव पाटील असल्याचे ना. पाटील यावेळी म्हणाले.

गाडी दिली पण,डिझेलच नव्हते !

दोन राज्यांसह अनेक जिल्ह्यांना जोडणारा हा भोकरजवळील तापी नदीवरचा पुल तयार होणार आहे. घाला कपडा आणि चाला चोपडा हे वाक्य जिल्ह्यात प्रचलित असून मुंबई-नागपूर महामार्गाला लाजवेल असा हा रस्ता तयार झाला आहे. पुढील दोन वर्षात तुम्हाला या पुलावरुन पुन्हा यावे लागेल. पुर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी गाडी दिली होती परंतु डिझेलच दिले नव्हते. आताच्या मुख्यमंत्र्यांनी मंजूरीसह निधी देण्याचे काम केले आहे. त्यामुळे हे केवळ राज्याचे मुख्यमंत्री नसून सर्वसामान्यांमधील देव असल्याचे ना. पाटील यावेळी म्हणाले. या पुलासाठी सुमारे दिडशे कोटी रुपयांचा निधी त्यांनी दिल्याने आजचा दिवस हा या परिसरातील शेतकर्‍यांसाठी अतिशय आनंदाचा दिवस असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले. गिरीश महाजन वाढवणार दाढी

मला देखील वाढी वाढवावी लागेल ..

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकासाचे कामे सुरु आहे. यातच मेडीकल हबच्या कामाला देखील सुरुवात झाली आहे. ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला जात आहे. या पुलाचे कामाला लवकरच सुरुवात होणार असून दिलेल्या वेळेत काम पुर्ण करणार असल्याची ग्वाही ना. गिरीश महाजन यांन यावेळी दिली. तसेच व्यासपीठावर आता चार-चार दाढीवाले बसले असून सध्या दाढीवाल्याचे राज्य आहे त्यामुळे मला देखील वाढी वाढवावी लागेल अशी कोपरखळीही ना. महाजन यांनी मारली.

ठाकरे मंत्रालयाची पायरीच चढले नाही

पुर्वीचे मुख्यमंत्री कधी घराची पायरी उतरले नाही. मंत्रालयाची पायरी चढले नाही. मात्र आमचे मुख्यमंत्री 20 तास काम करीत असून प्रत्येक जिल्ह्यात कामांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये मिसळत आहे. ते फिरले असते तर त्यांच्यावर हे दिवस आले नसते त्यांची जागा जनतेने त्यांना दाखवून दिली असे म्हणत ना. गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

मी जलसंपदा मंत्री असतांना भोकर येथील तापी नदीवर पुल व्हावा यासाठी ना. गुलाबराव आणि माजी आ. चंद्रकांत सोनवणे यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. परंतु दुर्देवाने निवडणुकीनंतर त्यांनी आमची साथ सोडली त्यामुळे या पुलाचे काम प्रलंबित राहीले. मात्र देवाला हेच मान्य होत की या पुलाचे काम आपल्याच हातून व्हावे आणि आज त्या पुलाच्या कामाचे भूमिपूजन होत आहे. या पुलामुळे नागरिकांचा 70 किमीचा फेरा वाचणार असल्याचे ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या