Saturday, April 27, 2024
Homeनगरबोठेच्या मोबाईलचा लॉक उघडण्याचे पोलिसांसमोर आव्हान

बोठेच्या मोबाईलचा लॉक उघडण्याचे पोलिसांसमोर आव्हान

अहमदनगर| Ahmednagar| सचिन दसपुते

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याचा मोबाईल पोलिसांनी घर झडतीत जप्त केला आहे.

- Advertisement -

तो मोबाईल उच्च कंपनीचा आहे. या मोबाईलचा लॉक खोलण्यासाठी पोलीस यंत्रणा प्रयत्न करत आहे. त्या मोबाईलमधील डाटा करफ्ट होऊ नये, म्हणून पोलीस तांत्रिक तज्ञांची मदत घेत आहेत. दरम्यान, हा गुन्हा तांत्रिक पुराव्यावर उभा असून पोलिसांनी सर्व तांत्रिक पुरावे न्यायालयात दिले आहेत. यामुळे न्यायालयाने बोठे याचा जामीन अर्ज नामंजूर केला आहे.

रेखा जरे यांची हत्या झाल्यानंतर पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली. या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार बोठे असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली. तेव्हापासून बोठे पसार झाला आहे. पसार होताना त्याने आपला मोबाईल घरीच ठेवला.

पोलिसांनी तो मोबाईल घर झडतीदरम्यान जप्त केला. तो मोबाईल या गुन्ह्यातील महत्त्वपूर्ण पुरावे देणारा आहे. परंतु, बोठे याचा मोबाईल उच्च कंपनीचा आहे. या मोबाईलला दोन सिक्युरिटी लॉक आहेत. हे लॉक सामान्य खोलण्याचा प्रयत्न केल्यास त्यातील डाटा आपोआप करफ्ट होण्याची भीती आहे.

गेल्या दहा ते बारा दिवसांपासून पोलिसांनी बोठे याचा मोबाईल जप्त केला आहे. या मोबाईलमध्ये महत्त्वपूर्ण माहिती असल्याची शक्यता आहे. यामुळे मोबाईलमधील डाटा करफ्ट होऊ नये, यासाठी पोलिसांनी सावधपणे कार्यवाही सुरू केली आहे. मोबाईलचा लॉक खोलण्यासाठी पोलीस तांत्रिक क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. रेखा जरे यांच्यावर (पान 4 वर)

- Advertisment -

ताज्या बातम्या