Thursday, April 25, 2024
Homeनगरस्टँडिंग वॉरंटविरोधात बोठे न्यायालयात

स्टँडिंग वॉरंटविरोधात बोठे न्यायालयात

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

रेखा जरे हत्याकांड प्रकरणी पारनेर न्यायालयाने मंजूर केलेल्या स्टॅडिंग वॉरंटला आरोपी बाळ बोठेने जिल्हा न्यायालयात आव्हान दिले आहे.

- Advertisement -

स्टॅडिंग वॉरंटला स्थगिती द्यावी, अशी मागणी बोठेने केल्याची माहिती सुत्रांकडून समजली. दरम्यान या अपिलावर शनिवारी (दि. 6) सुनावणी होत असून न्यायालयाने पोलिसांचे म्हणणेही मागविले असल्याची माहिती तपासी अधिकारी पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी दिली.

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची 30 नोव्हेंबरला जातेगाव घाटात गळा चिरून हत्या करण्यात आली. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत पाच आरोपींना अटक केली. त्या आरोपींच्या माहितीनुसार खुनाचा सूत्रधार हा बाळ बोठे असल्याचे समोर आले. दोन महिने उलटून गेल्यानंतरही बोठे पोलिसांना अजून सापडलेला नाही.

दरम्यान त्याचा जिल्हा न्यायालय व औरंगाबाद खंडपीठाने अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केला आहे. बोठेच्या अटकेसाठी पोलिसांनी कायद्याचा आधार घेत स्टॅडिंग वॉरंटला न्यायालयातून मंजुरी घेतली. स्टॅडिंग वॉरंटमुळे देशभरातील पोलीस दिसेल तेथे बोठेला अटक करू शकतात. मात्र त्या स्टॅडिंग वॉरंटलाच बोठेने जिल्हा न्यायालयात आव्हान दिले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या