Friday, April 26, 2024
Homeनगरथकीत कर्जदारांसह पतसंस्थांनाही दिलासा

थकीत कर्जदारांसह पतसंस्थांनाही दिलासा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

थकीत कर्जदार व नागरी सहकारी पतसंस्थांना दिलासा देण्यासाठी ‘सामोपचार एक रकमी कर्ज परतफेड योजनेस’ सरकारने पुन्हा एकदा मुदत वाढ दिली आहे. याबाबतचे परिपत्रक काल जारी करण्यात आले आहे.

- Advertisement -

राज्यातील नागरी पतसंस्थांच्या बुडीत कर्ज वसुलीसाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. त्यास पुन्हा एकदा सरकारकडून 31 मार्च 2023 पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. या निर्णयामुळे थकीत कर्जदारांसह पतसंस्थांनाही दिलासा मिळणार आहे.

यासाठी काही अटी आहेत. त्यात अनुत्पादक कर्ज धरण्याचा कालावधी दि 31 मार्च, 2020 निश्चित करण्यात यावा. ज्या तडजोडीचा व्याजदर 12 टक्के करण्यास तसेच, कर्जदार तडजोडीची रक्कम एकरकमी भरण्यास तयार असल्यास 8 टक्के दराने व्याजाची आकारणी करण्यास मुभा असणार आहे. तथापि परतफेडीचा दर कॉस्ट ऑफ फंड पेक्षा कमी असू नये. या योजनेंतर्गत अर्ज करण्याची शेवटीची तारीख 28 फेबु्रवारी 2023 आहे. या प्राप्त अर्जावर संचालक मडळाने 31 मार्च 2023 अखेर निर्णय घेणे आवश्यक आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या