Thursday, April 25, 2024
Homeधुळेबोअरवेल वाहनाच्या डिझेल टाकीचा भडका

बोअरवेल वाहनाच्या डिझेल टाकीचा भडका

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

बोअरवेल वाहनाला वेल्डींग करीत असतांना चालकाने अचानक वाहन पुढे घेतल्यामुळे डिझेल टाकीचा भडका उडाला.

- Advertisement -

त्यात एका वेल्डींग कामगाराचा मृत्यू झाला. तर दुसरा देखील गंभीर आहे. काल दि. 21 रोजी सकाळी ही घटना घडली. याप्रकरणी वाहन चालकावर सोनगीर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धुळे तालुक्यातील बुरझड शिवारातील बबन देवरे यांच्या पवन वेल्डींग दुकानासमोर मुनाफ नुर मोहम्मद खाटीक (वय 36 रा. लामकानी ता. धुळे) व बबन पांडुरंग देवरे (वय 46 रा. बुरझड) हे बोअरवेल गाडीच्या (क्र. जीजे 03 एचई 1265) डिझेल टाकीचे वेल्डींग काम करीत होते.

तेव्हा गाडी चालक रजनिकांत नानजीभाई पानसरा (रा. खरडी ता. कालावड जि. जामनगर, गुजरात) याने अचानक गाडी सुरू केली. व निष्काळजीपणे पुढे घेतली. त्यामुळे गाडीच्या डिझेल टाकीचा भडका उडाला. त्यात दोघे गंभीर जखमी झाले.

त्यात मुनाफ खाटीक याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर दरम्यान घटनेनंतर गाडी चालक पसार झाला. अशी फिर्याद नुर मोहम्मद बशीर खाटीक (वय 60 रा. नेहरू नगर, लामकानी) यांनी सोनगीर पोलिसात दिली आहे.

त्यानुसार बोअरवेल गाडी चालकावर सोनगीर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोहेकाँ शामराव अहिरे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या