Friday, April 26, 2024
Homeजळगावडिझेल दर वाढीमुळे बोअरवेल व्यवसाय ठप्प

डिझेल दर वाढीमुळे बोअरवेल व्यवसाय ठप्प

भुसावळ – प्रतिनिधी bhusawal

डिझेलच्या दरामध्ये सतत होत असलेल्या वाढीमुळे बोअरिंग व्यवसाय करणे परवडत नसल्यामुळे जिल्हा भरातील बोअरिंग व्यवसायिकांनी आपला व्यवसाय २६ जानेवारीपासून बंद करण्यात आलग आहे. शासनाने डिझेलचे दर कमी करावे अन्यथा व्यवसायात दहा टक्के वाढ कण्याचा निर्णय जिल्हा बोअरिंग असोसिएशच्या वतीने घेण्यात आला आहे.

- Advertisement -

डिझेलचे दर सतत वाढत असल्यामुळे बोअरिंग व्यवसाय करणे परवडत नाही. त्यामुळे डिझेलचे दर कमी करण्याची मागणी असोशिएशनतर्फे जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आली आहे. या मागणीसाठी २६ जानेवारीपासून व्यवसाय बंद करण्यात आले आहे.त्यामुळे व्यवसायातील मजुरांचा रोजगार बुडाला असल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. शहरातील कन्हाळा रोडवरील घोडे पीर बाबा दर्गाह जवळ शहरातील १२-१३ व्यवसाजिकांची वाहने मागील ४-५ दिवसांपासून उभी आहे.

डिझेल दर वाढीमुळे व्यवसायिकांनी दहा टक्के दर वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या दरवाढीचा फटका सामान्यांनाही बसणार असल्याचे चित्र आहे. त्यासाठी केंद्र व राज्य शासनाने डिझेल दर कमी केल्यास व्यवसायातील दर ही नितमित ठेवण्याची भुमिका असोशिएशनच्या वतीने घेण्यात आल्याची माहिती अध्यक्ष सुरेश तायडे, उपाध्यक्ष अर्जुन तायडे, तुषार घ्यार, दीपक महाजन, पंकज पाटील, संजय तायडे, विकास सरोदे यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या