Friday, April 26, 2024
Homeधुळेबोराडीसह परिसरात अवकाळीचा धुमाकूळ

बोराडीसह परिसरात अवकाळीचा धुमाकूळ

बोराडी – Boradi – वार्ताहर :

शिरपूर तालुक्यातील बोराडीसह परिसरात काल मध्यरात्री वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे परिसरातील शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

- Advertisement -

त्यात कापूस, ज्वारी, बाजरी, सोयाबीन, मका आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तर बोराडीतील व्यापारी भुषण वाणी, शेतकरी निलेश महाजन यांचे 20 ते 25 क्विंटल मका पाण्याखाली आल्याने मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान परिसरात यापुर्वी देखील दोन-तीनवेळा अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने मुग, उडीद, ज्वारी, चवळी आदी पिके पूर्णपणे शेतातच खराब झाली. तरी देखील त्याचे पंचनामे अद्याप झालेले नाही.

त्यात काल रात्री वादळी वार्‍यासह झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे कापूस पिक जमीनदोस्त झाले आहे. तर काही शेतकर्‍यांची मका, सोयाबीन, ज्वारी काढणी सुरू होती. अचानक आलेल्या पावसामुळे सर्व शेतीमाल पाण्यात भिजवून गेला आहे.

त्यात गजू बडगुजर, रामा गुजर, विशाल पावरा, सुनिल पावरा, प्रकाश पावरा, संजय पावरा, शामकांत पाटील, प्रकाश पाटील, राज निकम, किशोर भदाणे, मनोज बडगुजर यांच्यासह अनेक शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी तत्काळ पंचनामा करून शासनाने मदत करावी, अशी मागणी केली आहे.

अवकाळी पावसाने बोराडीसह परिसरात धूमाकूळ घातला आहे. काल रात्रीपासून सतत पडणार्‍या पावसामुळे व्यापार्‍यासह शेतकर्‍याचे मोठे नुकसान झाले आहे.

तसेच भूषण वाणी या तरुण व्यापार्‍यांसह परिसरातील तरुण शेतकरी निलेश महाजन, श्रीकांत पाटील यांनी विक्रीसाठी काढून तयार केलेला 20 ते 25 क्विंटल मका पाण्याखाली गेला असून पावसाने चार तासाच्या कालावधीमध्ये बोराडी परिसराला वेढा घातला होता.

या पावसामुळे व्यापार्‍यांच्या चांगलीच धडकी भरली. दुकानातील माल सुरक्षित ठिकाणी हलविताना त्यांची तारांबळ उडाली. बोराडीसह ग्रामीण भागातील बुडकी-कोडीद, गधडदेव रस्त्यांवर पाणी साचले असून बोराडी गावात मध्य रात्री पासून वीज पुरवठा खंडित झाला.

गेल्या दोन-तीन दिवसांपासून बोराडीसह परिसरात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे.काल रात्रभर सततधार पाऊस होता. काल झालेल्या घटनेमुळे इतर व्यापारी आधीच सतर्क झाले असून काहींनी पावसाचा अंदाज घेवून दुकानातील माल सुरक्षित ठिकाणी हलविला आहे. त्यामुळे काही प्रमाणात का असेना होणारे नुकसान टळले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या