Saturday, April 27, 2024
Homeनाशिकपुस्तकांमुळे सामाजिक बदल शक्य

पुस्तकांमुळे सामाजिक बदल शक्य

पिंपळगाव ब.। प्रतिनिधी | Pimpalgaon Basvant

सामाजिक बदल घडविण्यात पुस्तके महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. वेगेवेगळ्या संस्कृती, धर्म, प्रथा, परंपरा समजावून घेऊन त्याबद्दल आदर निर्माण करण्याचे काम पुस्तके करत असतात. एकमेकांबद्दलचा राग, द्वेष, मत्सर आदी भावना कमी करून प्रेम, आदर, दया व बंधूभाव जनमानसात रुजविण्यास पुस्तके मदत करतात.

- Advertisement -

दुखाःत आशेचा किरण व एकमेकात सुसंवाद घडविण्याचे काम देखील पुस्तके करत असतात. त्यामुळे सध्यस्थितीत विद्यार्थ्यांना (students) चांगली पुस्तके वाचण्यास प्रेरित करावे. त्यातूनच समाजाचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दिलीप शिंदे (Principal Dr. Dilip Shinde) यांनी व्यक्त केले.

येथील कर्मवीर काकासाहेब वाघ कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात (Karmaveer Kakasaheb Wagh in Arts, Science and Commerce College) ग्रंथालय विभागाच्या वतीने ‘जागतिक पुस्तक व स्वामित्व हक्क’ (World Book & Ownership) दिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रमप्रसंगी डॉ.शिंदे बोलत होते. यावेळी उपप्राचार्य प्रा. ज्ञानोबा ढगे, उपप्राचार्य डॉ.एस.एन. अहिरे, आय.क्यु.ए.सी. समन्वयक प्रा.भगवान कडलग, नॅक समन्वयक डॉ.एन.यु. पाटील, ग्रंथपाल प्रा.ए.पी. मेहेंदळे उपस्थित होते. प्राचार्य डॉ.दिलीप शिंदे पुढे म्हणाले की, यानिमित्ताने स्वामित्व हक्काविषयी जनजागृती समाजात निर्माण होण्याची गरज आहे.

म्हणून लेखक, प्रकाशक व वितरक यांचे हक्क जपले पाहिजे. त्यामुळे दर्जेदार व अभिनव अशा साहित्याची निर्मिती होऊन त्या माध्यमातून शिक्षण (education), विज्ञान (Science), संस्कृती इ. जनसामान्यापर्यंत पोहचेल. ग्रंथपाल प्रा.ए.पी. मेहेंदळे यांनी या दिनाची माहिती, इतिहास, महत्त्व व उद्देश स्पष्ट केला. तसेच यानिमित्ताने प्रत्येकाने वाचन सवय अंगीकारावी असे आवाहन केले. सूत्रसंचालन प्रा.ज्ञानोबा ढगे यांनी तर डॉ.एस.एन. अहिरे यांनी आभार मानले. याप्रसंगी डॉ.पवनंजय सुदेवाड, प्रा.तुषार मोरे, प्रा.अमोल वाकडे, प्रा.धनंजय कडलग, प्रा.श्रीमती. सविता कदम, प्रा.वाटपाडे, प्रकाश शेडगे, दीपक बनकर, महेश पाटील, बाळू सोनावणे, शिवप्रसाद गवळी आदींसह महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या