Friday, April 26, 2024
Homeनाशिक‘कादवा’कडून शेतकऱ्यांना एफआरपीनंतर बोनस

‘कादवा’कडून शेतकऱ्यांना एफआरपीनंतर बोनस

ओझे | वार्ताहर | Oze

कादवा सहकारी साखर कारखान्याचे (Kadwa Sahakari Sakhar Karkhana) गळीत हंगाम 2020 -21 मध्ये गाळप केलेल्या ऊसाच्या बिलापोटी रक्कम 100 रुपये प्र.मे.टनप्रमाणे पेमेंट संबंधित ऊस उत्पादकांच्या बँक खाती (Bank accounts) वर्ग केले आहेत. ऊसाचा हप्ता व कारखान्यातर्फे रासायनिक खते उधारीने मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये (Farmers) आनंदाचे वातावरण आहे….

- Advertisement -

सन 2020-21 या हंगामात केंद्र शासनाने रिलीज कोट्याप्रमाणे साखर (Sugar) विक्री सुरु आहे. मात्र यंदा साखरेस भाव नसून साखरेस उठाव नाही. परिणामी साखर विक्री कमी होत असल्याने विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.

कोणतेही उपपदार्थ निर्मिती नसताना उत्तर महाराष्ट्रातील इतर कारखान्यांपेक्षा कादवाची एफआरपी 2697.32 रु. सर्वाधिक आहे. अनेक कारखाने मागील वर्षाची एफआरपी (FRP) पूर्ण देऊ शकले नसताना कादवाने मागील वर्षाची एफआरपी पूर्ण अदा केली.

या वर्षाची यापूर्वी 2425 रु. व आता पुन्हा 100 रु. याप्रमाणे 2525 रुपये ऊस उत्पादकांचे बँक खाती वर्ग केले आहे. उर्वरीत एफआरपीची रक्कम लवकरात लवकर अदा करण्याचा व्यवस्थापनाचा प्रयत्न आहे. ऊस लागवड वाढावी यासाठी कारखान्याचे प्रयत्न सुरु असून सिडफार्ममध्ये (Seedfarm) विविध जातींचे व्हीएसआयने (VSI) प्रमाणित केलेले ऊस रोपे बनविण्यात येत आहे.

शेतकऱ्यांना उधारीने रासायनिक खतांचे वाटप करण्यात येत आहे. कादवाच्या इथेनॉल प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असून सभासद शेतकऱ्यांना सदर प्रकल्पासाठी ठेवी ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. ठेवीवरती 10 टक्के व्याज देण्याचे जाहीर केले आहे. त्यास अनेक सभासद व संस्थांनी प्रतिसाद देत ठेवी देण्यास सुरुवात केली आहे.

शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस लागवड करावी, असे आवाहन चेअरमन श्रीराम शेटे (Shriram Shetty), व्हा. चेअरमन उत्तम भालेराव (Uttam Bhalerao) व संचालक मंडळाने केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या