Saturday, April 27, 2024
Homeदेश विदेशBomb Threat Call: दिल्ली-पुणे विमान बॉम्बने उडवण्याची धमकी; सर्व प्रवाशांना सुखरुप उतरवले

Bomb Threat Call: दिल्ली-पुणे विमान बॉम्बने उडवण्याची धमकी; सर्व प्रवाशांना सुखरुप उतरवले

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi

दिल्ली विमानतळावर (Delhi Airport) दिल्ली-पुणे विस्तारा विमानात (Bomb Threat Call in Delhi-Pune Vistara Flight) बॉम्ब असल्याची धमकी देण्यात आली आहे. विमानतळावर उतरल्यानंतर संपुर्ण विमानाची (Checking In Airplane) तपासणी सुरू आहे. सर्व प्रवाशांना त्यांच्या सामानासह सुखरूप विमानातून खाली उतरवण्यात आले आहे. या विमानात बॉम्ब असल्याबाबतचा कॉल आज जीएमआर कॉल सेंटरला आला होता.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, दिल्ली विमानतळावर दिल्ली-पुणे विस्तारा विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाली, त्यानंतर सर्व प्रवाशांना त्यांच्या सामानासह सुखरूप खाली उतरवण्यात आले. जीएमआर कॉल सेंटरला फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याचा फोन आल्यानंतर एकच खळबळ उडाली. विमानतळावरील आयसोलेशन बे येथे विमानाची तपासणी करण्यात आली.

दरम्यान, विमानात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नसल्याची CISF आणि दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला आहे. विमानाची चौकशी पूर्ण झाली आहे. पुन्हा सर्व प्रवासी विमानात बसून थोड्याच वेळात विमान पुण्याकडे रवाना होणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या