Muharram 2021 : शिया मुस्लिमांच्या मिरवणुकीत बॉम्बस्फोट, तिघांचा मृत्यू

jalgaon-digital
1 Min Read

दिल्ली | Delhi

भारतासह (India) अनेक देशांमध्ये मोहरम सण (Muharram 2021) साजरा होत आहे. याच सणादिवशी सिंधमध्ये शियांच्या मिरवणुकीत (Shiite procession) मोठा बॉम्बस्फोट (Bombblast) घडवून आणण्यात आला आहे.

पाकिस्तानच्या (Pakisthan) सिंध प्रांतातील बहावलनगर येथे मोठा स्फोट झाला. शिया मुस्लीम (Shiite Muslim) समाजाच्या मिरवणुकीदरम्यान रस्त्याच्या कडेला हा स्फोट झाला. यात तिघांचा मृत्यू झाला, तर ५० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल (Viral on social media) होत असलेल्या फोटोंत, स्फोटात जखमी झालेले लोक रस्त्याच्या कडेला बसून मदतीची वाट पाहत असल्याचे दिसते.

दरम्यान या स्फोटाची जबाबदारी अजून कोणीही घेतली नाही. तर या प्रकरणी सध्या तपासयंत्रणा कामाला लागली आहे. पाकिस्तानात इस्लामिक देश ()Islamic countries म्हणून ओळखला जात असला तरी तिथे शिया, अहमदी आणि कादियानी मुस्लीम कायमच कट्टरपंथीयांच्या निशाण्यावर राहिले आहेत. कट्टरपंथी शिया समुदायावर हल्ला करण्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. त्यामुळे हा स्फोटही त्यांनीच घडवला असावा अशी चर्चा आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *