Wednesday, April 24, 2024
Homeनगरबोल्हेगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीची बिनविरोधची परंपरा कायम

बोल्हेगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीची बिनविरोधची परंपरा कायम

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

बोल्हेगाव (ता.नगर) विविध कार्यकारी सेवा सोसायटीची निवडणुक बिनविरोध झाली आहे. या सोसायटीची बिनविरोधची परंपरा कायम राहिली आहे.

- Advertisement -

यावेळी बिनविरोध निवड झालेल्या उमेदवारांचे सत्कार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आला. बिनविरोध झालेले उमेदवार किसन कोलते, सुरेश वाटमोडे, संपत वाकळे, बबन वाकळे, मच्छिंद्र कळमकर, सुनील देठे, रामचंद्र कोलते, रेहंमान सय्यद, राजु देठे, मोहन डुरकूले, सुुनिता कळमकर, सुनमबाई वाटमोडे यांची सदस्यपदी निवड झाली आहे.

जिल्हा बँकेत संचालक झाल्यापासुन आजवर कायम शेतकरी हिताची भुमिका घेतली. गोरगरिब कर्जदार शेतकर्‍यांच्या हिताचेच निर्णय घेतले. जनतेने सेवा सोसाटीच्या निवडणूकीमध्ये आमच्या विचारांच्या लोकांना निवडून दिले. येणार्‍या निवडणूकीमध्येही विजयाची घोडदौैड कायम राहील. असे माजी मंत्री कर्डिले बोल्हेगाव सेवा सोसायटीची निवडणूक बिनविरोध पार पडली. त्यावेळी सदस्यांचा सत्कार प्रसंगी बोलत होते. यावेळी तुषार सोनवणे, नवनाथ कोलते, अरूण थिटे, विनोद जोंधळे, दत्तात्रय कळमकर, मच्छिंद्र कापडे आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या