Saturday, April 27, 2024
Homeजळगावशरीर सुखाची मागणी करित विवाहितेचा विनयभंग

शरीर सुखाची मागणी करित विवाहितेचा विनयभंग

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

विवाहिता घरात एकटी असतांना अनाधिकाराने विवाहितेच्या (Entry into matrimonial home) घरात प्रवेश करीत तिच्याकडे शरिर सुखाची (Body pleasure ) मागणी(demanding) करीत विनयभंग (molestation) केल्याची घटना जळगाव तालुक्यातील एका गावात घडली. दरम्यान, घटनेची वाच्यता केल्यास विवाहितेच्या पतीला जीवेठार मारण्याची धमकी देणार्‍या गणेश रघुनाथ सोनवणे रा. नांदा बु. ता.जि. जळगाव याच्याविरूद्ध तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

जळगाव तालुक्यातील एका गावात विवाहिता वास्तव्साय आहे. विवाहिता घरात एकटी असतांना गणेश सोनवणे याने त्यांच्या घरात जबरदस्तीने प्रवेश केला. तसेच विवाहितेला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत त्याने शरिर सुखाची मागणी केली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे विवाहितेने आरडाओरड करण्यास सुरुवात केली.

यावेळी संशयिताने विवाहितेला तुझा पती खूप माजला आहे, तू जर कोणाला ही घटना सांगितली तर मी तुला व तुझ्या पतीला जीवंत सोडणार नाही अशी धमकी देवून तेथून पळून गेला. घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या विवाहितेने घडलेली घटना आपल्या कुंटूंबियांसमोर कथन केली. त्यानंतर पोलीसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार तालुका पोलीस ठाण्यात संशयित गणेश रघुनाथ सोनवणे रा. नांदा बु. याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ बापू पाटील हे करीत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या