Friday, April 26, 2024
Homeजळगावगणेशपूर येथे विहिरीत आढळला मृतदेह

गणेशपूर येथे विहिरीत आढळला मृतदेह

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

तालुक्यातील गणेशपूर येथे गणेशपुर-ओढरे रोडवरील शेतातील विहिरीत एका ६५ वर्षीय वृध्दाचा मृतदेह आढळुन आला आहे. हि घटना दि,२३ रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या दरम्यान उघडकीस आली. मयताचे नाव ईश्‍वर राजधर पाटील रा.देवगाव, ता.पारोळा असे आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

गणेशपुर शिवारातील गणेशपूर-ओंढरे रोडवरील दशरथ चिंधा पाटील यांच्या शेतातील विहिरीत ईश्‍वर राजधर पाटील रा.देवगाव, ता.पारोळा यांचा मृतदेह आढळुन आला आहे. दरम्यान त्यांनी आत्महत्या केली की, त्यांचा घातपात झाला. याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला पो.पाटील भागवत मागो सुर्यवंशी यांच्या खबरीवरुन आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोना.दिपक ठाकुर करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या