Saturday, April 27, 2024
HomeजळगावPhoto बोदवड नगरपंचायतवर भगवाराज ; नगराध्यक्षपदी आनंदा पाटील तर उपनगराध्यक्षपदी सौ.रेखा गायकवाड

Photo बोदवड नगरपंचायतवर भगवाराज ; नगराध्यक्षपदी आनंदा पाटील तर उपनगराध्यक्षपदी सौ.रेखा गायकवाड

बोदवड – प्रतिनिधी Bodwad

बोदवड नगराध्यक्ष (Mayor) तथा उपनगराध्यक्षा पदाची आज निवड करण्यात आली. यात (shivsena) शिवसेनेचे आनंदा पाटील (Ananda Patil) नगराध्यक्ष तर सौ.रेखा गायकवाड (Ananda Patil) उपनगराध्यक्षा अशी निवड करण्यात आली.

- Advertisement -

बोदवड नगरपंचायत (Bodwad Nagar Panchayat) मध्ये अकरा नगरसेवक महिला तर सहा नगरसेवक पुरुष आज दि.18 रोजी बोदवड नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडणूक पार पडली नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेचे आनंदा पाटील व राष्ट्रवादी कडून योगिता खेवलकर हे निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केले होते व उपनगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेचे कडून रेखा गायकवाड आणि राष्ट्रवादीकडून मुजमिल शाह यांचे उमेदवारी अर्ज आलेले होते.

सभेमध्ये निवडी साठी हात उंच करून मतदान घेण्यात आले त्यात शिवसेनेचे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांना शिवसेनेचे नऊ नगरसेवक आणि भाजप च्या एकमेव उमेदवाराने मतदान केले त्यानुसार दहा विरुद्ध सात शिवसेनेने नगरपंचायत वर आपली सत्ता प्रस्थापित केली बोदवड नगरपंचायत कार्यालयात निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी पीठासीन अधिकारी उपविभागीय अधिकारी भाग भुसावळ तथा निवडणूक निर्णय अधिकारी रामसिंग सुलाने यांनी कामकाज पाहिले तर सहाय्यक म्हणून नगरपंचायत मुख्याधिकारी आकाश डोईफोडे हे होते.

निवड झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून फुलांच्या पाकळ्या, गुलाल यांची उधळण करत नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांच्या सह सेनेचे सर्व नगरसेवक व नगरसेविका यांची मिरवणूक आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सोबत मिरवणूक काढली.

मिरवणुकी दरम्यान बोदवड ची ग्रामदेवता रेणुका देवी मंदिरात दर्शन घेऊन शिवद्वार वरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण केले त्यानंतर गांधी चौक जवळील बोदवड शाहवली बाबा यांच्या मजार वर चादर चढवली तेथून आमदारासह केले. त्या नगरसेवकाचा शिवसेला पाठिंबा भारतीय जनता पार्टी कडून निवडून आलेले नगरसेवक विजय बडगुजर यानी शिवसेला पाठीबा दिला.

- Advertisment -

ताज्या बातम्या