Friday, April 26, 2024
Homeजळगावमृतदेह आणला थेट महापालिकेत

मृतदेह आणला थेट महापालिकेत

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील निलंबित कर्मचारी विष्णू चावदस बागडे (वय 55) यांचे राहत्या घरीच निधन झाले. त्यांना निलंबित केल्याने

- Advertisement -

ते सतत तणावात रहात होते. अशातच बडतर्फच्या तीन वर्षानंतर गुरूवारी त्यांचे राहत्या घरी निधन झाले. त्यांचे प्रेत मनपा प्रांगणातच त्यांची मुलं, नातेवाईक, आप्तेष्टांनी आणले होते.

मयताची पत्नी, मुलं, नातेवाईक यांनी यावेळी आयुक्तांना निवेदन दिले. पत्नीस पेन्शन व मुलास अनुकंपावर नोकरीवर घेण्यात यावे, अशी त्यांनी मागणी केली.

तेव्हा हे न्यायालयीन प्रक्रिया आहे. याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेवू, असे आश्वासन आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी त्यांना दिले.

मनपा प्रांगणातच मयताचे प्रेत समाजबांधव व आप्तेष्टांनी आणले व आम्हाला न्याय द्या, मयताच्या पत्नीस पेन्शन व मुलास अनुकंपावर सेवेत घेण्यात यावे अशी त्यांची मागणी होती.

मागणी मान्य केल्याशिवाय आम्ही येथून उठणार नाही व प्रेतही नेणार नाहीत अशी भूमिका मयताची पत्नी व समाजबांधवानी घेतली होती.

नंतर आयुक्तांना 13 व्या मजल्यावर जावून निवेदन देण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणावर समाज बांधव जमलेला होता. आस्थापना विभागाचे प्रमुख म्हणून राजेंद्र प्रभाकर पाटील यांनी त्यांची भेट घेतली व त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.

- Advertisment -

ताज्या बातम्या